26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषजेक फ्रेझर-मॅक्गर्क, स्टब्ज, रसिक चमकले; दिल्लीची मुंबईवर मात

जेक फ्रेझर-मॅक्गर्क, स्टब्ज, रसिक चमकले; दिल्लीची मुंबईवर मात

या विजयामुळे दिल्लीने १० सामन्यांत १० गुणांनिशी गुणतक्त्यात पाचवे स्थान पटकावले

Google News Follow

Related

शेवटच्या षटकापर्यंत थरारक झालेल्या सामन्यात दिल्लीने मुंबईवर १० धावांनी मात केली. दिल्लीचा हा गेल्या पाच सामन्यांतला चौथा विजय. या विजयाने दिल्लीने मुंबईतील वानखेडेमध्ये मुंबईविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपाही काढला. या सामन्यात ५००हून अधिक धावांचा वर्षाव झाला. अरुण जेटली स्टेडिअमवर टी२० सामन्यात नोंदली गेलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.

या विजयामुळे दिल्लीने १० सामन्यांत १० गुणांनिशी गुणतक्त्यात पाचवे स्थान पटकावले आहे. तर, नऊ सामन्यांत अवघ्या सहा गुणांची कमाई करून मुंबई नवव्या स्थानी आहे.२५८ लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. मात्र रोहित शर्मासह अन्य दोन विकेट झटपट गेल्यामुळे मुंबईची अवस्था तीन बाद ५६ झाली होती. त्यानंतर तिलक वर्माने हार्दिक पांड्यासोबत आशा वाढवली. त्याने विशेषतः कुलदीप यादवला लक्ष्य केले. मात्र पांड्या बाद झाला. त्यानंतर वर्माने अर्धशतक ठोकले. टीम डेव्हिडमुळे मुंबईला विजयाची आस होती. मात्र तो १८व्या शतकात बाद झाला. त्यानंतर शेवटच्या षटकात वर्मा धावबाद झाला आणि मुंबईच्या स्वप्नांवर पाणी फेरले. अर्थात स्पर्धेत पुन्हा भरारी घेण्यासाठी मुंबईच्या हातात आणखी पाच सामने आहेत.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये मला ‘नमस्ते’ची ताकत समजली

२०१५पासून आम आदमी पार्टीने जाहिरातींवर केला १५०० कोटी रुपयांचा खर्च

अदानी बंदराबाबत फेक बातमी पसरवणारा ‘तो’ व्हिडीओ गुजरातचा नाही इजिप्तचा !

‘ही ममता बॅनर्जींची मोठी चूक’

दिल्लीकडून खलील अहमदने रोहित शर्माला तिसऱ्या षटकात तंबूत पाठवले. मुकेश कुमारने इशान किशनला पहिल्याच षटकात बाद केले. तर, खलीलने पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवची विकेट घेतली. दिल्लीच्या रसिक दारने तीन विकेट घेतल्या.

सुरुवातीला दिल्लीने मुंबईविरुद्ध त्यांची उच्चांकी धावसंख्या उभारली. दिल्लीने चार विकेट गमावून २५७ धावा केल्या. जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टॅन स्टब्जने कमाल केली. जेक फ्रेझरने २७ चेंडूंत ८४ धावा तडकावल्या. त्याने ११ चौकार व सहा षटकार ठोकले. मॅकगर्कने त्याचे अर्धशतक अवघ्या १५ चेंडूंत ठोकून आपल्याच विक्रमाची बरोबरी केली. त्यामुळे दिल्लीची अवस्था शून्य बाद ९२ अशी होती. त्यानंतर ट्रिस्टॅन स्टब्ने २५ चेंडूंत नाबाद ४८ धावा केल्या. त्यानंतर पोरेलनेही (३६) तोलामोलाची साथ दिली. त्यानंतर शाई होप (४१) याने पाच षटकार लगावले आणि पंतने (२९) त्याचा लोकप्रिय हेलिकॉप्टर शॉट लगावला. स्टब्जमुळे दिल्लीने २५० धावसंख्येचा टप्पा पार केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा