दिल्लीतील हवेची गुणवत्ता फटाक्यांमुळे घसरली असा दावा केला जात असताना हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार शेतातील पराली आणि गाड्यांचा धूर यामुळे हवा सर्वाधिक प्रदूषित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हा निर्देशांक सोमवारी दिल्लीतील काही भागात ४००च्या घरात असल्याचे जाहिर करण्यात आले. दिल्लीतील एक चतुर्थांश हवा पराली जाळल्यामुळे प्रदूषित झाल्याचे या निर्देशांकात म्हटले आहे. पुण्याच्या संस्थेने म्हटले आहे की, सोमवारी पराली जाळल्यामुळे झालेले हवेचे प्रदूषण २३.४ टक्क्यांपर्यंत झाले आहे. शनिवारी हे प्रदूषण पराली जाळल्यामुळे ते १५ टक्के होते तर रविवारी २० टक्के होते.
शेजारच्या राज्यात कापणी झाल्यानंतर हे गवत जाळले जाते. त्याचा फटका दिल्लीला दरवर्षी बसत असतो. सोमवारी गाड्यांच्या धुरामुळे झालेले प्रदूषण १३.७ टक्के इतके होते. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर पुन्हा एकदा लोक कामावर जाऊ लागल्यामुळे गाड्यांची संख्या वाढल्याने या प्रदूषणात भर पडली आहे.
हे ही वाचा:
‘हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते बनवू’
चौकशीसाठी हजर राहा! सिद्धरामय्या यांना समन्स
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पुन्हा धमकी, पाच कोटींची मागणी
ग्रँटरोडच्या हॉटेलच्या खोलीत सापडला सुरतच्या व्यापाऱ्याचा मृतदेह,मृतदेहासोबत होती मुलगी
शिवाय, दिल्लीच्या आणि आसपासच्या परिसरात असलेल्या उद्योगधंद्यांमुळे प्रदूषणात ३.४ टक्के भर पडली आहे. विविध स्वरूपाच्या बांधकामामुळे २ टक्के तर रस्त्यांवरील धुळीमुळे १ टक्का प्रदूषण वाढले आहे. कचरा जाळला जातो त्यातून १.३ टक्के प्रदूषणात वाढ झाली असून विविध ऊर्जा स्रोतांमुळे १.७ टक्के प्रदुषण वाढले आहे तर घरगुती स्वरूपाच्या प्रदूषणामुळे त्यात ३.६ टक्के भर पडली आहे.
गाझियाबादमुळे ९ टक्के तर नोएडामुळे दिल्लीत ६.५ टक्के प्रदूषण वाढत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
दिवाळी दरम्यान फटाक्यांमुळे हा निर्देशांक ३०० ते ४०० च्या घरात होता मात्र दिवाळी झाल्यानंतरही तो कमी झालेला नाही. त्यामुळे फक्त फटाक्यांमुळेच प्रदूषण वाढते हा दावा फोल ठरला आहे.