दिल्ली एम्सचा यु-टर्न, २२ जानेवारीला अर्धा दिवस ओपीडी बंदचा निर्णय मागे!

एम्स रुग्णालयाने परिपत्र जारी करत दिली माहिती

दिल्ली एम्सचा यु-टर्न, २२ जानेवारीला अर्धा दिवस ओपीडी बंदचा निर्णय मागे!

दिल्लीस्थित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) आता सोमवारीही चालू राहणार आहे.अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर २२ जानेवारी रोजी रुग्णालयाचा ओपीडी अर्धा दिवस बंदचा निर्णय अखेर एम्स प्रशासनाने मागे घेतला आहे.एम्सने रविवारी एक परिपत्रक जारी करून सांगितले की, रुग्णालयाची ओपीडी सेवा सामान्यपणे चालू राहणार आहे.

एम्सच्या अधिकाऱ्यांनी २१ जानेवारी रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, ‘रुग्णांच्या काळजीसाठी बाह्यरुग्ण विभाग खुला राहणार आहे, जेणेकरून रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आणि रुग्णांना सेवेच्या सर्व सुविधा मिळतील.सर्व गंभीर क्लिनिकल केअर सेवा कार्यरत राहतील. सर्व केंद्र प्रमुख, विभाग प्रमुख, युनिट आणि शाखा अधिकारी यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या अंतर्गत काम करणार्‍या सर्व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे एम्सच्या परिपत्रकात म्हटले आहे.

हे ही वाचा:

ओवेसी लवकरच रामभक्त होतील अन ‘राम-नामाचा’ जप करतील!

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अयोध्या कारसेवेला हजर असल्याचा सादर केला पुरावा!

सुशांतसिंह राजपूत आज ३८ वर्षांचा असता;बहिणीने नव्या पुस्तकातून जागवल्या आठवणी!

लंडनच्या गल्ल्यांमध्ये ‘जय श्रीरामा’चा गजर!

यापूर्वी, शनिवारी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त दिल्लीतील एम्स आणि सफदरजंग रुग्णालयासह केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी चारही रुग्णालयाने २२ जानेवारीला दुपारी २.३० वाजेपर्यंत बंद राहतील, असे सांगण्यात आले होते.मात्र, या काळात आपत्कालीन सेवा सुरु राहतील असेही सांगण्यात आले होते.दरम्यान, एम्सने रविवारी एक परिपत्रक जारी केले आणि सांगितले की, रुग्णालयाची ओपीडी सेवा सामान्यपणे चालू राहणार आहे.त्यामुळे आता रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाहीये.

 

Exit mobile version