संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये जवानांसोबत साजरी केली होळी!

संरक्षण मंत्र्यांसोबत लष्करप्रमुख मनोज पांडे देखील उपस्थित

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये जवानांसोबत साजरी केली होळी!

देशभरात होळीचा उत्साह वाढत आहे. दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैनिकांसोबत होळी साजरी करण्यासाठी लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील लेह येथे पोहोचले.केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या स्वागतासाठी लेह विमानतळावर लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर बीडी मिश्रा, वरिष्ठ प्रशासन आणि लष्कराच्या अधिकारी उपस्थित होते.

भारतीय सैन्यासोबत होळी साजरी करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत लष्करप्रमुख मनोज पांडे देखील उपस्थित होते.संरक्षणमंत्र्यांनी लेह येथील ‘हॉल ऑफ फेम’ येथे देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. संरक्षणमंत्र्यांनी जवानांना गुलाल लावून मिठाई खाऊ घातली.देशातील नागरिक सुरक्षितपणे घरोघरी होळी साजरी करू शकतील, यासाठी देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर शूर सैनिक तैनात केले जातात.

हे ही वाचा :

दिग्विजय सिंग, कार्ति चिदंबरम काँग्रेसच्या चौथ्या यादीत

खजिन्याच्या शोधासाठी निघाले होते, कारमध्ये मिळाले जळालेले तीन मृतदेह!

माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांचा भाजपमध्ये प्रवेश!

केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवू लागले!

अशा परिस्थितीत जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी संरक्षण मंत्री लेहला पोहोचले. होळीचा सण साजरा करताना सैनिकांनी गुलालाची उधळण करून एकमेकांना मिठाई खाऊ घातली.दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सियाचीनला भेट देणार होते.तेथील आपल्या भारतीय जवानांसोबत होळी साजरी करण्याचा संरक्षण मंत्र्यांचा बेत होता.मात्र, खराब हवामानामुळे त्यांनी लेहला जाण्याचा बेत आखला अन तेथील आपल्या जवानांसोबत होळी साजरी केली.

Exit mobile version