पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचे समर्थन, देशद्रोहाच्या आरोपाखाली आमदाराला अटक!

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली माहिती 

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचे समर्थन, देशद्रोहाच्या आरोपाखाली आमदाराला अटक!

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांवर आणि पाकिस्तानवर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तथापि, भारतातही अनेक लोक असे आहेत जे पाकिस्तानला पाठिंबा देताना दिसत आहेत. हे कसे आहे माहितेय का,  ‘भारताचं खायचं आणि पाकिस्तानचं गुणगान गायचं’. भारतात असे अनेक लोक भरले आहेत.

याच दरम्यान, आसाममधूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. एआययूडीएफ पक्षाचे आमदार अमिनुल इस्लाम यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग आणि त्याचे समर्थन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीटकरत याबाबत माहिती दिली.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल एआययूडीएफचे आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक करण्यात आल्याची माहिती आसामचे पोलिस डीजीपी हरमीत सिंह यांनी दिली. पोलिसांनी अमिनुल इस्लामला अटक करून नागाव पोलिस ठाण्यात नेले आहे. आसाम पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आमदार अमिनुल इस्लाम यांनी सार्वजनिकरित्या दिलेले दिशाभूल करणारे आणि प्रक्षोभक विधान व्हायरल झाले होते. या प्रकरणी नागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आमदारावर बीएनएसच्या कलम १५२/१९६/१९७(१)/११३(३)/३५२/३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

“भोंगा मुक्त मुलुंड”, मशिदींवरील अनधिकृत भोंगे पोलिसांनी उतरवले!

पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्या अतुल मोनेंच्या पत्नीला मध्य रेल्वेत नोकरी

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड कसुरीला दरदरून घाम फुटला!

पाकिस्तानचा शेअर बाजार अडीच हजारांनी पडला!

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले, पाकिस्तानला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देण्याचा किंवा त्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. एआययूडीएफचे आमदार अमिनुल इस्लाम यांनी असे काही म्हटले आहे, ज्यामुळे आसाममधील लोक संतप्त झाले आहेत. दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे समर्थन करण्यासाठी व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्याचे मी पाहिले आहे.

या प्रकरणी आमदाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रक्षण करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री सरमा यांनी दिला.

पाकसोबत गंगाजमनी तहजीबवाल्यांचा इलाज करा... | Dinesh Kanji | Robert Vadra | Pahalgam Attack |

Exit mobile version