महिला सैनिकांसाठी केंद्र सरकारची भेट!

सुट्यांच्या नियमात वाढ करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी

महिला सैनिकांसाठी केंद्र सरकारची भेट!

महिला सैनिकांच्या मातृत्व, बाल संगोपन आणि मूल दत्तक या रजेच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून रविवारी सांगण्यात आले.भारताच्या तिन्ही दलातील सर्व श्रेणीतील महिला सैनिकांसाठी आता त्यांच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये चांगले संतुलन राखण्यास मदत होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

सुट्यांच्या नियमांमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलातील महिला सैनिक, खलाशी आणि हवाई योद्धांसाठी त्यांच्या अधिकारी समकक्षांच्या बरोबरीने मातृत्व, बाल संगोपन आणि मूल दत्तक साठी देण्यात येणाऱ्या सुट्यांमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.हा नियम लागू झाल्यानंतर सेनेतील सर्व महिलांना आता समान सुट्टी मिळणार आहे, मग ती महिला सैनिक अधिकारी असो वा कोणत्याही श्रेणीतील महिला सैनिक असो.

हे ही वाचा:

बेंगळुरूत महिला भूवैज्ञानिकाची चाकूने हत्या!

एक कोटीची लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याला रंगेहाथ पकडले!

गाझामध्ये युद्धबंदीसाठी अरब नेत्यांचा अमेरिकेवर दबाव!

एकनाथांच्या मदतीला एकनाथ धावले!

संतुलन राखण्यास मदत होईल
संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आलेला हा निर्णय सशस्त्र सेनेतील महिला सैनिकांच्या सहभागी असलेल्या दृष्टिकोनातून घेण्यात आला आहे.महिला सैनिकांच्या सुट्यांच्या वाढ करण्याच्या प्रस्तावामुळे त्यांच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये संतुलन राखण्यास मदत होईल.त्यामुळे महिला सैनिकांच्या कामात देखील सुधार होईल.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे नेहमीच असे मत होते की, महिला सर्व क्षेत्रात पुरुषांप्रमाणे समान असले पाहिजेत.त्यामुळे भारतीय सैनिक दलात भूदल, नौदल आणि वायुदलात महिला सैनिकांना समाविष्ट करून आमूलाग्र बदलाची सुरुवात केली आहे.

प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर
जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये कार्यरत होण्यापासून ते युद्धनौकांवर तैनात होण्यापासून आणि आकाशावर अधिराज्य गाजवण्यापर्यंत, भारतीय महिला आता सशस्त्र दलातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात अडथळे तोडत पुढे जात आहेत.

Exit mobile version