30.2 C
Mumbai
Tuesday, May 13, 2025
घरविशेषदहशतवादाला खतपाणी घालण्याचे घाणेरडे काम आम्ही अमेरिकेसाठी केले!

दहशतवादाला खतपाणी घालण्याचे घाणेरडे काम आम्ही अमेरिकेसाठी केले!

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे खळबळजनक वक्तव्य

Google News Follow

Related

दहशतवादी कृत्यांमध्ये पाकिस्तानचा हात आहे, असे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. मात्र पाकिस्तानकडून वारंवार त्याचा इन्कार करण्याचा प्रयत्न झाला आहे. आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी मात्र आपण दहशतवादाला मदत करण्याचे काम हे अमेरिकेसाठी करत होतो असे म्हटल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी Sky News ला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली. मुलाखतकाराने विचारले की, पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांना निधी पुरवणे, त्यांना मदत करणे हे काम अनेक वर्षे केले जात आहे. त्याबद्दल आसिफ म्हणाले की, आम्ही गेली ३० वर्षे अमेरिकेसाठी हे घाणेरडे काम करत आलो आहोत.

ही टिप्पणी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आली आहे, त्यामुळे याला महत्त्व प्राप्त झाले आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना निवडून त्यांची गोळ्या घालून हत्या केली, ज्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा संबंध पाकिस्तानस्थित संघटनांशी जोडला गेला आहे.

हे ही वाचा:

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आसिफ शेखचे घर उडवले

मेणबत्या कसल्या पेटवता, तुमच्यातले गद्दार शोधा…

“भोंगा मुक्त मुलुंड”, मशिदींवरील अनधिकृत भोंगे पोलिसांनी उतरवले!

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचे समर्थन, देशद्रोहाच्या आरोपाखाली आमदाराला अटक!

आसिफ म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे “संपूर्ण युद्ध” सुरू होण्याची शक्यता आहे आणि जगाने याकडे गांभीर्याने पाहायला हवं कारण दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत. त्यांनी पुन्हा एकदा भारतावर “खोटा हल्ला घडवून आणल्याचा” निराधार आरोप केला.

आसिफ म्हणतात की, भारताकडून जे काही घडेल त्याला आमचं उत्तर ‘मोजून मापून’ दिलं जाईल,” असं आसिफ म्हणाले. त्यांनी स्पष्ट केलं, “जर पूर्ण हल्ला झाला, तर मग अखेरचा युद्ध होणारच.” ते म्हणाले, जगाला याची चिंता असली पाहिजे. दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये टक्कर झाली, तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
248,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा