नाशिक मधील गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी सामनामधून केला होता. सामना वृत्तपत्रातून चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप मंत्री दादा भुसे करत मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खासदार संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.
हे प्रकरण शिवसेना फुटल्यानंतर मालेगावमध्ये मे २०२३ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या घेण्यात आलेल्या सभेतील आहे. या सभेत ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांनी दादा भुसे यांच्यावर आरोप केला होता.ते म्हणाले, गिरणा सहकारी साखर कारखान्याचा लिलाव थांबविण्यासाठी दादा भुसे यांनी गिरणा बचाव समिती स्थापन केली. कारखाना वाचविण्यासाठी निधी उभारण्यासाठी पुढे येण्याचे जाहीर आवाहन केले. मालेगावातील प्रतिष्ठत व्यक्ती, शेतकरी, मजूर हे या भावनिक आवाहनाला बळी पडले.
हे ही वाचा:
‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये चमकलेल्या मल्लखांबप्रेमी मनोज प्रसादच्या टीमला सहा लाख
भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण
‘विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होणार नाहीत’
न्यूजक्लिककडून शेतकरी आंदोलनाला मदत; चिनी कंपन्यांचे समर्थन?
गिरणा मोसम शुगर अॅग्रो अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नावाने हजारो लोकांकडून शेअर्ससाठी पैसे जमा करून १७८ कोटी २५ लाख ५० हजार १० रुपये या शुगर ऍग्रोचे प्रवर्तक, प्रभारी दादा भुसे यांनी हडपले,असा आरोप अद्वय हिरे यांनी केला होता.त्यानंतर संजय राऊत ट्विटरव सामानातून या प्रकरणावर प्रकाश टाकत कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणी काही दिवसाचा अवधी देत संजय राऊतांना हे आरोप सिद्ध करण्याचे आव्हानही दिले होते. मात्र त्यानंतर आता दादा भुसे यांनी थेट कोर्टात धाव घेत संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.
दरम्यान जेष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर यांच्यामार्फत दाखल केलेल्या या फौजदारी खटल्यात मंत्री दादा भुसे यांची जन सामान्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने सामना या वर्तमानपत्रातून बदनामी केल्याने आरोप खासदार संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. यापूर्वी खासदार राऊत यांच्या मुंबई व दिल्ली येथील निवासस्थानी केलेल्या आरोपांबाबत पुरावे व खुलासा देण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र राऊत यांच्याकडून कुठलेही उत्तर त्या नोटीसिस प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे सामना या वृत्तपत्राचे कात्रण व इतर पुरावे जोडून हा खटला दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या खटल्या संदर्भात खासदार संजय राऊत यांना २३ ऑक्टोबरला मालेगाव येथील मे. न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.