‘दीप्ती शर्माने चार्ली डीनला धावचीत केल्याची ‘ती’ घटना योग्यच’

मेरिलिबोन क्रिकेट क्लबने नियमांबाबत केले स्पष्टीकरण

‘दीप्ती शर्माने चार्ली डीनला धावचीत केल्याची ‘ती’ घटना योग्यच’

भारतीय महिला क्रिकेट संघाची गोलंदाज दीप्ती शर्मा ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात तिने इंग्लंडच्या चार्ली डीनला धावचीत केले होते. त्यावरून दीप्ती शर्मा टीकेचे लक्ष्य बनली. तिने खिलाडुवृत्ती दाखविली नसल्याची टीका तिच्यावर इंग्लिश खेळाडूंनी आणि त्यांच्या समर्थकांनी केली.

पण दीप्ती शर्माने म्हटले आहे की, चार्लीला आपण इशारा दिला होता. शिवाय, मैदानावरील पंचांनाही यासंदर्भात सांगण्यात आले होते. त्यानंतरच तिला धावचीत करण्यात आले होते.

चार्ली डीनने या सामन्यात ४० धावांची खेळी केली होती. तिच्या या खेळीमुळे सामन्यात रंगत निर्माण झाली होती. शेवटी भारताने ही लढत जिंकली.

दीप्ती म्हणाली की, हे आमचे डावपेच होते. कारण ती वारंवार गोलंदाजी करण्यापूर्वीच क्रीझ सोडत असल्याचे दिसले होते. आम्ही तिला आधीच इशारा दिला होता. त्यामुळे आम्ही क्रिकेटच्या नियमांचे पालन केलेले आहे.

ही लढत भारताची विक्रमी गोलंदाज झुलन गोस्वामीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यामुळे तिला विजयाची भेट देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होते. प्रत्येक संघाला विजय मिळवायचा असतो. आम्ही हे एक संघ म्हणूनच केले. आम्ही पंचांनाही हे कळविले होते पण तिने इशारा मनावर न घेता गोलंदाजी करण्यापूर्वी क्रीझ सोडण्याची सवय सुरूच ठेवली.

हे ही वाचा:

नवरात्र २०२२: महाराष्ट्राचं शक्तीस्थळ तुळजापूर

विलेपार्लेमध्ये घरांना तडे जाऊन आठ झोपड्या कोसळल्या

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप

‘त्या रिकाम्या खुर्चीत राऊत यांच्या चपलाही दिसतील’

 

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ट्वीट करत दीप्तीच्या या निर्णयावर टीके केली.. त्याने ट्वीट केले की, मांकड नियमासंदर्भात जी चर्चा सुरू होती ती रोचक होती. विविध मतमतांतरे या घटनेबद्दल पाहायला मिळाली. पण मला अशा पद्धतीने सामना जिंकणे आवडले नसते. अर्थात, इतरांच्या मतांचेही स्वागत आहे.

या सामन्यानंतर क्रिकेट नियमांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) म्हटले की, एमसीसीने वर्षभरापूर्वीच या नियमात सुधारणा केलेली आहे. त्यानुसार नियम क्रमांक ४१ ज्यात खेळण्याची अनधिकृत पद्धत हा नियम बदलून नियम क्रमांक ३८ ज्यात धावचीत हा नियम सर्वमान्य करण्यात आला आहे. त्यामुळे गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी जर दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाने क्रीझ सोडले तर ती सर्वस्वी त्याची जबाबदारी असेल. नियम अगदी स्पष्ट आहे.

Exit mobile version