‘पठाण’मधील बेशरम रंग उतरवणार

दीपिकाची 'भगवी बिकिनी' बदलणार?

‘पठाण’मधील बेशरम रंग उतरवणार

२०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘पठाण’ या चित्रपटावरून सध्या जोरदार गदारोळ सुरू आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या बहुप्रतिक्षित पठान चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या पहिल्या गाण्यावर सोशल मीडियावर रोष पाहायला मिळाला. दीपिका पदुकोणच्या ‘भगव्या बिकिनी’वरून बरेच वादंग झाले. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली. या संपूर्ण वादात एक नवीन माहिती समोर येत आहे. सेन्सॉर बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांना चित्रपटात बदल करावे लागणार आहेत.

सेन्सॉर बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पठाण हा चित्रपट नुकताच सीबीएफसीकडे प्रमाणपत्रासाठी पाठवला गेला होता. सीबीएफसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या चित्रपटात समितीने निर्मात्यांना चित्रपटात काही बदल करण्याचा सल्ला दिला आहे. हे बदल चित्रपटातील गाण्यांबाबतही आहेत. समितीने पठाण चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वी सुधारित आवृत्ती सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सीबीएफसीचे म्हणणे आहे की, सेन्सॉर बोर्ड नेहमीच अभिव्यक्ती आणि लोकांच्या संवेदनशीलतेमध्ये योग्य संतुलन राखते. परस्पर संवादातून सर्व समस्यांवर तोडगा निघू शकतो. कोणत्याही प्रसंगातून व्याख्या होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. जे सत्य आणि वास्तवापासून लक्ष हटवते. निर्माते आणि प्रेक्षक यांच्यातील विश्वास जपणे खूप गरजेचे आहे. निर्मात्यांनी या दिशेने काम केले पाहिजे.

हे ही वाचा:

ऑस्ट्रेलियाच्या बाजारपेठेत भारतीय निर्यातदारांचे आता अनोखे स्वागत

हॉटेलला आग लागल्यावर लोकांनी पाचव्या मजल्यावरून मारली उडी

उझबेकिस्तानमध्ये सिरप प्यायल्याने ‘इतक्या’ मुलांचा मृत्यू

८० लाख रुपयांच्या बोगस नोटांसह एकाला अटक

सेन्सॉर बोर्डाने पठाणच्या निर्मात्यांना चित्रपटात बदल करण्यास सांगितले आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. दीपिकाच्या ‘भगव्या बिकिनी’मध्ये रंग बदलणार की सीन्स एडिट होणार? कारण कपड्यांबाबत एवढा गदारोळ झाल्यानंतर चित्रपटात बदल झाल्याची घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती.पठाण पुढील वर्षी २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाद्वारे शाहरुख खान तब्बल चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर परतणार आहे.

Exit mobile version