डीपफेकमुळे पोर्न मार्केटमध्ये वाढ, केवळ ४० रुपयांमध्ये बनवले जातात बनावट व्हिडिओ!

डीपफेकमुळे अनेकांनी गमावले जीव

डीपफेकमुळे पोर्न मार्केटमध्ये वाढ, केवळ ४० रुपयांमध्ये बनवले जातात बनावट व्हिडिओ!

डीपफेकमुळे अनेक निर्माते आणि स्कॅमर बनावट व्हिडिओ बनवत आहेत.आज जगभरात सुमारे १ लाख डीपफेक पॉर्न व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर आता इंटरनेटवर दररोज शेकडो डीपफेक पॉर्न व्हिडिओ क्लिप अपलोड होत आहेत.विशेष म्हणजे अनेक प्लॅटफॉर्म डीपफेक व्हिडिओ तयार करतात आणि ते केवळ ४० रुपयांमध्ये.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, ओपन सोर्स इंटेलिजन्स (OSINT) सोबत तपास केल्यांनतर एक बाब उघड झाल.ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानामुळे डीपफेक पोर्नोग्राफी व्यवसायात बदल होत आहे.सिंथेटिक पॉर्न अनेक वर्षांपासून आहे, परंतु एआय आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हे काम आता खूपच सोपे झाले आहे. यातून त्यांना अधिक कमाईही होत आहे. तसेच या प्रकारचे डीपफेक व्हिडिओ तयार करून ते प्रदर्शित करून अनेकजण कमाई करत आहेत.

होम सिक्युरिटी हिरोज अहवाल
२०२३ स्टेट ऑफ डीपफेक्सच्या अहवालात असे म्हटले आहे की,२०१९ च्या तुलनेत २०२३ मध्ये ५५० टक्के वाढ झाली आहे. यूएस-आधारित ऑनलाइन ट्रॅफिक ॲनालिटिक्स सर्व्हिस सेमरुषनुसार, जुलै आणि ऑगस्ट दरम्यान, वर्षाच्या श्रेणीत असणाऱ्या १० वेबसाइट्सने डीपफेक पॉर्न व्हिडिओ प्रदर्शित केले आणि या व्हिडिओला ३० करोड हुन अधिक लोकांनी पाहिले.या वेबसाइट्समध्ये एक आघाडीवर आहे तो म्हणजे मिस्टर डीपफेक्स, ज्याला ऑक्टोबर २०२३ मध्ये ११.१८ कोटी वापरकर्त्यांनी भेट दिली होती.

हे ही वाचा:

झोमॅटोवरून ऑर्डर केलेल्या बिर्याणीत सापडला मृत सरडा!

महाबिझ २०२४ समिटचे दुबई येथे आयोजन!

माऊंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक; ११ गिर्यारोहकांचा मृत्यू, १२ बेपत्ता!

केसीआर यांना तेलंगणात मात देणारे रेवंत रेड्डी कोण आहेत?

 

दरम्यान,अलीकडे भारतात डीपफेकचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात आहे. याचे एक उदाहरण उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात समोर आले.एका व्यक्तीला अचानक फेसबुक वरून एक कॉल आला आणि त्याने आत्महत्या केली.या व्हिडिओ कॉल मध्ये एक महिला कपड्यांशिवाय दिसली.यानंतर त्याला एक डीपफेक व्हिडिओ आला आणि एका व्यक्तीने बनावट पोलीस अधिकारी म्हणून ७४ हजार रुपये मागितले. या प्रकरणात त्या व्यक्तीचा छळ करण्यात आला.त्यामुळे त्याने आत्महत्या केली. २०२३ च्या स्टेट ऑफ डीपफेक्स अहवालात असे म्हटले आहे की, सुमारे ९८ टक्के व्हिडिओ हे डीपफेक्स पॉर्नशी संबंधित आहेत.

डीपफेकचे प्रामुख्याने दोन प्रकार
डीपफेकच्या मदतीने दोन मुख्य प्रकारचे व्हिडिओ तयार केले जातात. पहिल्या प्रकारच्या डीपफेक व्हिडिओमध्ये मानवी चेहरा दर्शविला जातो.तर दुसऱ्या प्रकारात संगणक हायपर-रिअलिस्टिक चेहरा वापरला जातो, जो अस्तित्वात नसतो.एआय टूल्समुळे हे काम खूप सोपे झाले आहे.

वास्तविक, ओपन सोर्स इंटेलिजन्सला तपासात असे आढळले आहे की, असे काही ॲप्स आहेत जे केवळ ४० रुपयांमध्ये काही मिनिटांत १५ सेकंदाचा बनावट अश्लील व्हिडिओ तयार करू शकतात. या प्रकारचे व्हिडिओ तयार करण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध देखील आहेत.तसेच अनेक ॲप्सने असे जाहीर केले आहे की, असे फिचर आम्ही केवळ मनोरंजनासाठी दिले आहेत.

Exit mobile version