मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल!

पोलिसांनी फेसबुकच्या मुख्यालयातून मागविली माहिती

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील डीपफेक व्हिडिओचे शिकार झाले आहेत.या प्रकरणी लखनऊच्या सायबर पोलिस ठाण्यात २ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. डीपफेक व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योगींचा चेहरा वापरून औषधे खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे. पोलिसांनी याबाबत फेसबुकच्या मुख्यालयातून माहिती मागवली आहे.

याआधीही अनेक मोठ्या व्यक्तींचे डीपफेक व्हिडिओ समोर आले आहेत. सर्वप्रथम, अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ समोर आला.यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली. यानंतर सचिन तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल अशा अनेक बड्या लोकांचा डीपफेक व्हिडिओ आला.आता तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा देखील डीपफेक व्हिडिओ समोर आला आहे.

हे ही वाचा:

बोरीवलीतील रिक्षा चालकांचे हे चाललंय काय?

मालदीवचे माजी राष्ट्रपती नशीद यांनी भारताची मागितली माफी

दिव्यांग महिलांसाठी अत्याधुनिक शिलाई मशिन्स

पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने मित्राची हत्या

डीपफेक व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मधुमेहाच्या औषधाचा प्रचार करताना दिसत आहेत.याशिवाय आणखी एका व्हिडिओमध्ये सीएम योगी आदित्यनाथ हे औषध खरेदी करण्याचे आवाहनही करण्यात करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणी लखनऊच्या सायबर पोलिस ठाण्यात २ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांचा तपास करण्यासाठी दोन पथके कार्यरत आहेत. या दोन्ही खात्यांची माहिती फेसबुककडून मागवण्यात आली आहे. एआयच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये टाकलेल्या ऑडिओमध्ये असे म्हटले जात आहे की, ‘ हे औषध भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. जो कोणी या वेबसाइटवरून औषध खरेदी करेल त्याला देवाचा मान मिळेल.लोकांची फसवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा चेहरा व्हिडिओमध्ये वापरण्यात आला आहे.

Exit mobile version