न्यूयॉर्क शहरामध्ये दिवाळीला शाळांना सुट्टी दिली जाणार आहे, अशी घोषणा महापौर ‘एरिक अॅडम्स’ यांनी सोमवारी केली.अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी हजारो न्यू यॉर्कर्स दरवर्षी दिवाळी साजरी करतात आणि राज्याच्या खासदारांनी अलीकडेच यूएस मधील सर्वात मोठ्या शालेय प्रणालीमध्ये सुट्टी म्हणून नियुक्त करणारा कायदा लागू केल्यानंतर ही घोषणा झाली. महापौर एरिक अॅडम्स यांनी या क्षणाला स्थानिक कुटुंबांसाठी महत्त्वपूर्ण विजय म्हटले.
दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे.हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो.या दिवाळी सणानिमित्त भारतातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात येते.
प्रकाशाचा सण असणाऱ्या दिवाळीत आता न्यूयॉर्क शहरातील शाळांना सुट्टी मिळणार आहे. सोमवारी याबाबतची घोषणा झाली.न्यूयॉर्क शहरातील सार्वजनिक शाळांना दिवाळीची सुट्टी देणारे विधेयक राज्याचे लोकप्रतिनिधी गृह आणि राज्य सिनेटने मंजूर केले याचा मला अभिमान आहे असे न्यूयॉर्क शहराचे मेयर ‘एरिक ॲडम्स’ यांनी सांगितले.हा भारतीय समुदायासह शहरातील रहिवाशांचा हा विजय आहे, असे यावेळी सांगण्यात आले.गव्हर्नर या विधेयकावर स्वाक्षरी करून याचे कायद्यात रूपांतर करतील असा आम्हाला विश्वास आहे असेही त्यांनी सह अधोरेखित केले.
हे ही वाचा:
रोममधील त्या रोमिओला होणार शिक्षा; कोलोझियम वास्तूवर कोरले नाव
थेट यष्टिचित होऊनही बाद दिले नाही
सोसायटीत बकरा आणला म्हणून रहिवाशांनी विरोध करत केलं हनुमान चालीसाचं पठण
समान नागरी कायद्यावरील मोदींच्या विधानानंतर खळबळ
हा केवळ भारतीय समुदायाचा विजय नवे तर हा न्यूयॉर्कचा विजय आहे, असे ॲडम्स यांनी नमूद केले.न्यूयॉर्क विधानसभेच्या सदस्या जेनिफर राजकुमार, न्यूयॉर्क स्टेट कार्यालयात निवडून आलेल्या ‘पहिल्या भारतीय-अमेरिकन’ महिला आहेत.दक्षिण आशियाई आणि भारतीय कॅरीबियाई समुदायाने या क्षणासाठी दोन दशकांहून अधिक काळ लढा दिला आहे, असे न्यूयॉर्कच्या लोकप्रतिनिधी गृहाच्या सदस्य ‘जेनिफर राजकुमार’ यांनी सांगितले.
आज आम्ही अभिमानाने सांगतो की दीपावली ही केवळ सुट्टी नाही. ही अमेरिकन सुट्टी आहे आणि दक्षिण आशियाई समुदाय अमेरिकेचा एक भाग आहे. खरंच, अमेरिकेच्या नागरी हक्क परंपरेत हिंदू, शीख आणि बौद्ध यांना महत्त्वाचे स्थान आहे, असे पुढे म्हणाल्या.त्यामुळे आता भारतासह न्यूयॉर्क मध्येही दिवाळी सणानिमित्त शाळांना सुट्टी राहील.