कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट

कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहेच, मात्र गेल्या ७२ दिवसातील ही निचांकी आकडेवारी ठरली आहे. कालच्या दिवसात ७० हजार ४२१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात ३ हजार ९२१ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

गेल्या २४ तासात भारतात ७० हजार ४२१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ९२१ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात १ लाख १९ हजार ५०१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २ कोटी ९५ लाख १० हजार ४१० वर गेला आहे. देशात २ कोटी ८१ लाख ६२ हजार ९४७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ७४ हजार ३०५ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ९ लाख ७३ हजार १५८ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

भ्रष्टाचारांची मालिका हीच का ठाणे महापालिका? राहुल घुले प्रकरणावरून भाजपाचा सवाल

…तर पुन्हा निर्बंध लावले जातील; वडेट्टीवारांची पुन्हा घाई

शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध

वन रुपी क्लिनिकचे डॉ. घुले यांना धमकी; पंतप्रधान कार्यालयाकडे मागितली मदत

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २५ कोटी ४८ लाख ४९ हजार ३०१ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version