28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषदिलासा.. कोरोनाची उतरती भाजणी सुरु

दिलासा.. कोरोनाची उतरती भाजणी सुरु

सक्रिय आणि नवीन रुग्णांमध्ये सातत्याने घट

Google News Follow

Related

कोरोनाचा चढता आलेख आता उतरणीला लागला आहे. भारतातहोत असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी गेल्या २४तासांत ३,६११ नवीन रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी हा आकडा ३,९६२ होता. त्याच वेळी, सक्रिय रुग्णाची संख्या कमी होऊन ती ३६,२४४ वरून ३३,२३२ वर आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

महामारीच्या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. देशातील४,४३,९९,४१५ लोकांनी कोरोनावर मत केली आहे. शुक्रवारी ३६ मृत्यूंसह मृतांची संख्या ५,३१,६४२ वर पोहोचली आहे, सरकारी आकडेवारीनुसार मृत्यू दर १.१८ टक्के होता तर बरे होण्याचे प्रमाण ९८.७४ टक्के नोंद झाले आहे.

कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४.४९ कोटी म्हणजे ४,४९,६४,२८९ इतकी नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण एकूण संक्रमित रुग्णांच्या तुलनेत फक्त ०.७ टक्के आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड लसीचे २२०६६ कोटी डोस देण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारतातील १,३०० नमुन्यांमध्ये ‘ओमायक्रोन ‘ चे प्रकार ‘एक्सबीबी२.३’ असल्याचे आढळून आले आहे. आताही एक्सबीबी.१.१६ प्रकाराची अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.

हे ही वाचा:

मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?

सर्बिया पुन्हा हादरले!! गोळीबाराच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री तब्बल १२ वर्षांनी भारतात, केली होती ‘ही’ भारताविरोधात वादग्रस्त विधानं

दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प, हजारो भाविक अडकले

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ३ मे २०२३ रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय प्रकरणांची संख्या ४०,१७७ होती, तर २ मे रोजी त्यांची संख्या ४४,१७५ नोंदवली गेली.४ मे पर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे ३६,२४४ होती. त्यामुळे कोरोनाच्या नवीन रुग्णामध्ये सातत्याने घट होत असल्याचे आकडेवारीवरून समजू शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा