ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण शहापूर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिले आहे.
शर्मा यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ठाणे जिल्ह्यातील हा शहापूर तालुका मुळात तलावांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे, तसाच तो ओळखला जातो. शहापूर तालुक्यात ठाणे जिल्ह्यातील ४० टक्के क्षेत्रातून तानसा, भातसा, वैतरणा, मध्य वैतरणा अशी मिठी जलाशये आहेत. याशिवाय रेल्वे, रस्त्यांचे जाळे, समृद्धी मार्ग यामुळे परिसराला खूप महत्व निर्माण झाले आहे. तेथे ग्रीन झोनमुळे औद्योगीक वसाहत होऊ शकत नाही.
हेही वाचा..
बांगलादेशला नमवत भारतीय महिला संघाची आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी फ्रान्समध्ये रेल्वे लाईन्सवर हल्ला
केंद्रीय मंत्री गडकरींचा टोलबाबत मोठा निर्णय, ‘टोल व्यवस्था केली रद्द’
पठाणकोटमध्ये ७ संशयास्पद व्यक्ती दिसले, जम्मूमध्ये हाय अलर्ट !
याशिवाय तालुक्यातील किल्ले माऊली, शिवधर्म संस्कार भूमी, सह्याद्री पर्वत, वाल्मिक ऋषींची समाधी, छोटे, मोठे तलाव, आदिवासी बहुल पठारांवरील टुरिझम, माळ पठार वैष्णव देवी, कसाराचे कटारा शहरात रुपांतर करून सर्वांगीण विकास होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर शहापूर तालुका हा पर्यटनाचा तालुका म्हणून घोषित करावा, अशी मागणी शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.