हिमाचल प्रदेशात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.हिमाचल प्रदेश सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीला राज्य आपत्ती म्हणून घोषित केले आहे. मात्र, या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा अशी मागणी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी केंद्राकडे केली आहे.
यासंदर्भातील अधिसूचना शुक्रवारी जारी करण्यात आली आहे, तर हिमाचल प्रदेशातील आपत्ती ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.रविवार पासून मुसळधार पावसाने राज्यात थैमान घातले असून शिमल्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये भूस्खलन झाल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बचाव कार्य जोरात सुरू असून राज्य सरकार बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.या अतिवृष्टीमुळे भूस्खलनात ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सोय करण्यासाठी राज्य सरकार विशेषत: लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले.राज्याचे अंदाजे १०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.केंद्रीय संघांनी नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी बाधित क्षेत्रांची पाहणी केली आहे आणि आम्हाला केंद्राकडून वेळेवर मदतीची आवश्यकता आहे,” सुखू म्हणाले.
हे ही वाचा:
दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब असल्याचा बनावट फोन
द्युती चंदवर चार वर्षांची बंदी, उत्तेजक चाचणीत ठरली दोषी
फुटिरतावादी यासिन मलिकची पत्नी पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारमध्ये
भारतीय नौदलाची INS विंध्यगिरी सज्ज; राष्ट्रपतींच्या हस्ते जलावतरण
समर हिलमधील शिवमंदिराच्या ढिगाऱ्यातून आणखी एक मृतदेह सापडला आहे. आतापर्यंत हिमाचल प्रदेशातील मृतांची संख्या ७५ वर पोहोचली असून यापैकी २२ मृत्यू एकट्या शिमला येथील आहेत, याची माहिती शिमला येथील एसपी संजीव कुमार गांधी यांनी दिली.मंदिराच्या ढिगाऱ्यात अजूनही सहा जण गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.हिमाचल प्रदेशात २४ जून पासून पावसाळ्याला सुरुवात झाली.हिमाचल प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये २१७ लोकांचा मृत्यू झाला असून ११,३०१ घरांचे अंशत: किंवा पूर्ण नुकसान झाले असल्याचे ,राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने म्हटले आहे.
राज्यातील एकूण ५०६ रस्ते अजूनही बंद असून ४०८ ट्रान्सफॉर्मर आणि १४९ पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत.गेल्या तीन दिवसांत कांगडा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातून २,०७४ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी राज्याला एक वर्ष लागेल, असे सुखू यांनी यापूर्वी सांगितले आहे.