२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवसासाठी समस्त देशवासींमध्ये उत्साह आहे. राज्य सरकारही आपापल्या परीने कार्यक्रम मोठ्या स्तरावर आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान आसाम सरकारने २२ जानेवारीला राज्यभर ड्राय डे घोषित केला आहे.
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कॅबिनेटची बैठक झाली.
या दरम्यान काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर पर्यटनमंत्री जयंत मल्ला बरुआ यांनी राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त २२ जानेवारी रोजी ड्राय डे घोषित करण्याचा निर्णय घेतला. राम मंदिराच्या उद्घाटनाला आमंत्रण देऊनही विरोधी पक्ष येत नसल्याबाबत सरमा यांनी टीका केली. विरोधी पक्षनेते सोहळ्यात येवो अथवा न येवो, मंदिराची भव्यता कमी होणार नाही. आम्ही आमंत्रण मिळण्यासाठी आसुसलो आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला आमंत्रण मिळत असेल तर तुम्ही तिथे गेले पाहिजे, असे सरमा म्हणाले.
हे ही वाचा:
रामलल्लाच्या सोहळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी मुस्लिम कुटुंब बनवत आहे ‘राम नावाच्या टोप्या’!
अवैध खाणकाम प्रकरणी लोकदलचे माजी आमदार दिलबाग सिंग अटकेत
महिला पोलिसांवरील अत्याचाराचे पत्र बनावट, पत्र व्हायरल करणाऱ्याचा शोध सुरू
पाकिस्तानात झालेल्या स्फोटात पाच पोलीस ठार
छत्तीसगढमध्येही ड्राय डे
गेल्या आठवड्यात, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णु देव सहाय यांनीही २२ जानेवारी रोजी ड्राय डे घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आमच्या सरकारने २२ जानेवारी रोजी ड्राय डे घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्या दिवशी अयोध्येत राम मंदिरात अभिषेक होणार आहे,’ असे सहाय यांनी स्पष्ट केले.