भारत आणि श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ मुकाबला

भारत आणि श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ मुकाबला

भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सुरू असलेल्या टी-२० मालिकेचा तिसरा सामना आज म्हणजेच २९ जुलै रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला मालिका जिंकण्याचा मान मिळणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सुरू झालेल्या टी-२० मालिकेचा पहिला सामना भारताने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली होती. पण बुधवार २८ जुलै रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकन संघाने भारताला धूळ चारत जोरदार कमबॅक केला. बँकेच्या या विजयासह त्याने मालिकेत १-१ बरोबरी साधली. त्यामुळेच गुरुवार, २९ जुलै रोजी खेळला जाणारा हा सामना म्हणजे दोन्ही संघांसाठी करो या मरो अशा प्रकारचा आहे.

हे ही वाचा:

‘अजितदादा… हे म्हणजे कुठला चित्रपट बघावा हे राज कुंद्रांनी सांगण्यासारखं’

पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा

अबब…१२ वर्षात मोदींनी कमावले ७ कोटी!

सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग केलं

भारतीय संघाला या मालिकेत कोविडचा चांगलाच फटका बसलेला दिसत आहे. भारतीय संघातील कृणाल पंड्या या अष्टपैलू खेळडूला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास सहा ते आठ मुख्य खेळाडूंना विलगीकरणात पाठवले गेले. त्यामुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात चार खेळाडूंनी भारतीय संघात आपले पदार्पण केले. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यात नवीन कोणत्या भारतीय खेळाडूचे पदार्पण होणार का? याकडे साऱ्यांच्या नजरा असणार आहेत.

पण अनेक मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची कामगिरी कशी होते याकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात पराभूत झालेल्या भारतीय संघासमोर या सामन्यात कमबॅक करण्यासाठीही राबावं असणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना सुरु होईल.

Exit mobile version