कोविडच्या दुसऱ्या लाटेचा फटका पर्यटनाला बसला आहे. कोविडमुळे पर्यटनासाठी अथवा इतर कोणत्याही कारणासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे वाहतूक क्षेत्राला देखील मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. भारतीय रेल्वेदेखील त्यातून सुटली नाही. प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे रेल्वेला अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यात आता प्रवाशांच्या लाडक्या दक्खनच्या राणीचीही भर पडली आहे. मुंबई- पुणे इंद्रायणी एक्सप्रेस पाठोपाठ आता दक्खनच्या राणीचीही सेवा रद्द करण्यात आली आहे.
गेल्याच आठवड्यात पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. ही गाडी जूनअखेरपर्यंत धावणार नाही. त्यापाठोपाठ आता पुणे-मुंबई डेक्कन क्वीनही रद्दचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी १४ मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात १ जूनपर्यंत ‘कडक निर्बंध’
भारताने इस्रायलविरोधी भूमिका घ्यावी-काँग्रेस
महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, पीआर आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा
इस्राएलविरुद्ध इस्लामिक राष्ट्र आक्रमक, ‘ही’ कारवाई करणार
करोनाच्या पहिल्या लाटेतील शिथिलतेनंतर रेल्वेने गाडी गाड्या सुरू केल्या होत्या. त्यात पुणे-मुंबई दरम्यानची इंद्रायणी एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन या गाड्यांचा समावेश होता. मात्र, सुरुवातीपासून या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. करोनाची दुसरी लाट तीव्र झाल्यानंतर या गाड्यांना मिळणाऱ्या प्रतिसादात घटच होत गेली. गाड्यांचे आरक्षण मोठ्या प्रमाणावर घटले. त्यामुळे प्रवाशांअभावी गेल्या महिन्यापासून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
डेक्कन क्वीनसह कोल्हापूर-मुंबई ही गाडीही १८ मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. यापूर्वीही प्रवाशांची मागणी नसल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात पुणे-नागपूर, पुणे-अमरावती, पुणे-अजनी, कोल्हापूर-नागपूर, दादर-पंढरपूर, दादर-शिर्डी, मुंबई-गदग, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-बिदर, मुंबई-लातूर, पुण्याहून प्रत्येक सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सोडण्यात येणारी पुणे-अहमदाबाद एक्स्प्रेस, पुणे-फलटण, लोणंद-फलटण या मार्गावरील डेमू रेल्वेचा समावेश आहे. पुणे-मुंबई प्रवासासाठी आता स्वतंत्र गाडी नाही. मात्र, दक्षिणेकडून पुणेमार्गे मुंबईकर्डे किंवा गुजरातकडे जाणाऱ्या गाड्यांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहे.
उत्तर भारतासाठी विशेष गाड्या
एका बाजूला या मार्गावर प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे काही गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत, तर दुसरीकडे उत्तर भारतासाठी काही विशेष गाड्या सोडाव्या लागल्या आहेत. बिहार व उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणांसाठी रेल्वेने मुंबईहून विशेष गाड्या चालवल्या आहेत. टाळेबंदीच्या भितीमुळे अनेक मजूरांनी मुंबईहून गावी स्थलांतर केल्यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यामुळे रेल्वेला विशेष गाड्यांची तरतूद करावी लागली.