तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यात बनावट दारूच्या सेवनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ६१ वर पोहोचली आहे. १८ जून रोजी ही दुर्घटना घडली होती. विषारी दारूच्या सेवनामुळे अजूनही ११८ लोक वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) या घटनेची स्वतःहून दखल घेतली असून तमिळनाडूचे मुख्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना नोटिसा बजावून या घटनेचा सविस्तर अहवाल मागितला आहे. या दुर्घटनेत सुरवातीला २५ जणांनी आपला जीव गमावला होता. मात्र, यामध्ये वाढ होऊन मृतांची संख्या ६१ वर गेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) देखील या घटनेची दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
हे ही वाचा..
सुरतमध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली अनेक देशहिताची विधेयके झाली संमत!
तिहेरी तलाक आणि हलाला, बुरख्याला विरोध !
ओक्लाहोमामध्ये भारतीय वंशाच्या एकाचा मारहाणीत मृत्यू
याप्रकरणी ४९ वर्षीय अवैध दारूविक्रेता के. कन्नुकुट्टी याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे २०० लीटर अवैध दारूची चाचणी केली असता त्यात प्राणघातक ‘मेथनॉल’ असल्याचे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, या प्रकरणी तामिळनाडू पोलीस अधिक तपास करत आहेत.