तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ६ टक्क्यांची घट

तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ६ टक्क्यांची घट

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे देशाला अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागले असले तरी या सगळ्यात एक सकारात्मक गोष्ट समोर आली आहे. गेल्या वर्षभराच्या कोरोनाकाळात देशातील तंबाखू सेवन करणाऱ्या आणि धुम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे निदर्शनास आले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. भारतात दरवर्षी तंबाखू सेवन आणि धुम्रपानामुळे १३ लाख जणांचा मृत्यू होता. आकडेमोड करायची झाल्यास हे प्रमाण दिवसाला ३ हजार पाचशे इतके आहे. मात्र, गेल्या वर्षभरात देशातील धुम्रपान आणि तंबाखू सेवनाचे प्रमाण सहा टक्क्यांनी कमी झाले आहे. यापूर्वी हे प्रमाण ३४.६ टक्के होते ते आता २८.६ टक्के इतके झाले आहे.

तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना आणि धुम्रपानाची सवय असलेल्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका ४० ते ५० टक्के अधिक असतो. या व्यसनांमुळे फक्त फुफ्फुसे, हृदय आणि कर्करोगच होत नाही तर शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम होतो, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत गेले दहा दिवस मोठी घट पाहायला मिळत आहे. दोन दिवसांचा अपवाद वगळता २१ मे ते ३१ मे या कालावधीत नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. गेल्या ५० दिवसांतील हा २४ तासांच्या कालावधीतला निचांकी आकडा आहे.

हे ही वाचा:

दुबईत 17 सप्टेंबरपासून आयपीएल सुरु?

पंजाबमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर?

फडणवीस-पवार सदिच्छा भेटीतून राजकीय चर्चांना उधाण

सीबीएसई, आयसीएसई परीक्षा रद्द?

ज्या आकडेवारीनुसार कालच्या दिवसात १ लाख ५२ हजार ७३४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३ हजार १२८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे.

Exit mobile version