मुंबईतील घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यात जाहिरातीचा महाकाय फलक पेट्रोल पंपावर पडून झालेल्या दुर्घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत सुरु असणारे बचाव कार्य आता संपले असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी आज बातमीदारांशी बोलताना दिली. मुंबई शहरात असणाऱ्या सर्व अशा पद्धतीच्या जाहिरात फलकांची तपासणी सुद्धा करण्यात येत असल्याचे गगराणी यांनी सांगितले.
हेही वाचा..
लालूप्रसाद, अब्दुल्ला मोदींच्या पत्नी-मुलांवरून टीका करण्यापर्यंत घसरले!
बरेलीची फरजाना बनली पल्लवी; मुरादाबादची नर्गिस बनली मानसी!
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचा फुटबॉलला अलविदा!
चाललंय काय? भारत चंद्रावर पोहोचला, कराचीतली मुले मात्र गटारात!
गगराणी म्हणाले, हे बचाव कार्य करताना खूप मर्यादा होत्या. कारण येथे पेट्रोल, डिझेलचा साठा होता. खूप सांभाळून काम करावे लागले. पालिका, एमएमआरडीए, पोलीस, एनडीआरएफ, महानगर गॅस अशा सर्व यंत्रणांनी ताळमेळ ठेऊन हे कार्य पार पाडले. सध्या इथला मलबा हटवण्याचे काम सुरु असून ते दिवसभरात संपेल. या परिसरातील विनापरवाना तीन जाहीरात फलक हटवण्यात येणार आहेत. जाहिरात फलकाबद्दल जी मानकं पालिकेने ठरवून दिली आहेत, त्याची तंतोतंत अंमलबजावणी झाली आहे का नाही याची तपासणी सुरु आहे. सर्वच यंत्रणांनी ही मानक तपासण्याची गरज असल्याचे गगराणी म्हणाले. शहरातील सर्व परवानाधारक फलकांची तपासणी सुरु असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणी याआधीच गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. संबंधित पेट्रोल पंपाच्या अनुषंगाने परवानग्या तपासण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.