भाजप नेत्याची हत्या करणाऱ्या पीएफआयच्या १५ जणांना फाशी!

केरळ जिल्हा न्यायालयाने श्रीनिवासन यांच्या हत्येसंदर्भात दिला निर्णय

भाजप नेत्याची हत्या करणाऱ्या पीएफआयच्या १५ जणांना फाशी!

भाजप नेते रंजित श्रीनिवासन यांच्या हत्येप्रकरणी १५ आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.केरळच्या मावेलिक्कारा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १५ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.हे सर्व आरोपी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेचे सदस्य होते.२०२१ साली भाजप ओबीसी नेते रंजित श्रीनिवासन यांची हत्या करण्यात आली होती.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, या प्रकरणात १५ आरोपींपैकी आठ आरोपींचा हत्या करण्यात प्रत्यक्ष सहभाग होता.तर अन्य चार आरोपींनी गुन्हा करणाऱ्या मुख्य आरोपीला मदत केली होती.तर इतर तीन आरोपींनाही गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.दरम्यान, केरळमधील भाजपाचे ओबीसी विभागाचे नेते रंजीत श्रीनिवासन यांची १९ डिसेंबर २०२१ रोजी राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. अलाप्पुझा येथील राहत्या घरात कुटुंबियांसमोरच आरोपींनी रंजीत श्रीनिवासन यांची हत्या केली होती.

हे ही वाचा:

रामदेवबाबांचा मेणाचा पुतळा न्यूयॉर्कच्या म्युझियममध्ये बसणार

अमेरिका संतापली; लवकरच इराणसमर्थक गटांवर हल्ले करणार

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला आलेल्या इमामांविरोधात निघाला फतवा!

चंदीगढमध्ये ‘इंडी’गढ ढेपाळला, महापौरपद भाजपाकडे

अजमल, अनूप, मोहम्मद अस्लम, अब्दुल कलाम ऊर्फ सलाम, सफरुद्दीन, मन्शद जसीब राजा, नवाज, समीर, नझीर, अब्दुल कलाम, झाकीर हुसैन, शाजी, नैसम आणि शेरनास अश्रफ हे सर्व रंजित श्रीनिवासन हत्ये प्रकरणातील १५ आरोपी असून या आरोपींना जिल्हा न्यायालयाकडून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

Exit mobile version