अखिल भारत हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांचे बुधवार,१ जून रोजी दुपारी निधन झाले आहे. मुंबईतील केईएम रग्णालयात दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला आहे.
प्रमोद पंडित जोशी (६०) हे कल्याण पश्चिमेला राहतात. अचानक त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रमोद पंडित जोशी हे करोडो हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान होते. त्यांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी आंदोलन आणि श्रीराम मंदिर निर्मितीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. अखिल भारत हिंदू महासभेचे प्रवक्ते असणारे प्रमोद पंडित जोशी हे सुरुवातीपासूनच श्रीराम जन्मभूमी आंदोलनामध्ये सक्रीय सहभागी होते.
प्रमोद पंडित जोशी यांचा श्रीराम जन्मभूमी विषयांतर्गत पुरातत्व विभाग आणि त्याच्याशी संबंधित कायदेशीर बाबींमध्ये सखोल अभ्यास होता. यामुळे त्यांचा जास्त मुक्काम हा मुंबईपेक्षा अयोध्या आणि दिल्ल्लीमध्ये असायचा. श्रीराम जन्मभूमीसोबतच काशी विश्वनाथ मंदिरदेखील त्यांच्यासाठी अत्यंत जिव्हळ्याचा विषय होता.
हे ही वाचा:
‘अहमदनगरचे नाव ‘अहिल्यादेवी नगर’ करा’
अमेरिकेत रुग्णालयात गोळीबार, गोळीबार करणाऱ्यासह ५ ठार
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये स्फोट, तीन जवान जखमी
गोव्यात तरुण पर्यटकांना घरात कोंबून मारहाण
रामजन्मभूमी चळवळ ही हिंदू महासभेने सुरू केली होती. त्यावेळी प्रमोद पंडित जोशी यांचा या आंदोलनात सहभाग होता. पुढे जेव्हा हे आंदोलन न्यायालयात गेले तेव्हा प्रमोद पंडित जोशी हे त्यात प्रबळ पक्ष होते. प्रमोद पंडित जोशी यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा खूप प्रभाव होता. त्यांच्या अशा या अकाली निधनाने शोक आणि हळहळ व्यक्त होत आहे.