मरण पावलेल्या त्यांच्या आईचे अंत्यसंस्कार करण्यावरून वेगवेगळ्या धर्माचे पाळणारे दोन भावांचे भांडण झाले. एकाने दफन करण्याचा आग्रह धरला तर दुसर्याला तिच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करायचे ठरवले होते.
रायकर खातून यांचे मंगळवारी लखीसराय जिल्ह्यातील एका गावात निधन झाले. तिच्या पहिल्या पतीचे ४५ वर्षांपूर्वी निधन झाले, त्यानंतर तिने राजेंद्र झा यांच्याशी लग्न केले. दुसऱ्या लग्नानंतर तिने तिचे नाव हिंदू रीतिअनुसर रेखादेवी ठेवलं. परंतु तिचा पहिला जन्मलेला मुलगा एमडी मोहफिल तिच्यासोबतच राहत होता. पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी सांगितले की, तो नियमितपणे मशिदीत नमाज अदा करत असे. बबलूचा याचा जन्म काही वर्षांनंतर झाला आणि भावंडांनी वेगळ्या धर्मांवर कधीही भांडण केले नाही… पण मंगळवारी त्यांच्या आईचे निधन झाल्यावर त्यांच्या आईच्या पार्थिवावर कोणत्या धर्मपद्धतीप्रमाणे अंत्यसंस्कार करायचे यावरून घमासान झाले. असे म्हण
हे ही वाचा :
मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास; पण ‘आप’ला जनतेने त्यांना पूर्ण नाकारले
आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका
…आणि सात वर्षांनंतर मृत महिला परतली
तिचे दुसरे लग्न झाल्यामुळे आधार, मतदार कार्ड आणि इतर कागदपत्रांवरून तिची हिंदू असल्याची ओळख पटली . म्हणून पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाला असा सल्ला दिला – की धाकट्या मुलाला अंत संस्कार परवानगी द्या आणि मोठा मुलगा नंतर इस्लामिक पद्धतीनुसार विधी करेल. पोलिसांनी परिस्थिती हाताळल्यामुळे ती नियंत्रणाबाहेर गेली नाही आणि अखेरीस दोन्ही धर्मांनुसार तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.