परममित्र प्रकाशनाचे सर्वेसर्वा माधव जोशी यांचे निधन झाले. अल्पकालीन आजाराने ठाण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अफाट लोकसंग्रह, मृदू संभाषण, ज्ञान, समाजभान आणि समाधानी वृत्ती यांचं परिपक्व मिश्रण म्हणजे माधव जोशी अशी त्यांची विशेष ओळख होती.
परममित्र प्रकाशनाचे सर्वेसर्वा माधव जोशी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) दीर्घकालीन कार्यकर्ते होते. तसेच ते भारतीय तत्वज्ञानाचे अभ्यासकही होते. सुस्वभावी व्यक्तिमत्व अशी माधव जोशी यांची विशेष ओळख होती. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांच्या निधनामुळे पुस्तक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
‘न्यूज डंका’चे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी माधव जोशी यांना श्रद्धांजली देत म्हटलं आहे की, ‘प्रकाशन क्षेत्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या परममित्र’ प्रकाशनाचे श्री. माधव जोशी यांचे काल ठाण्यात निधन झाले. माधवरावांनी माझे तिसरे पुस्तक ‘आयसी 814 हायजॅकनंतर…’ प्रकाशित केले होते. त्यांचे आकस्मिक निधन धक्कादायक आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.”
प्रकाशन क्षेत्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या परममित्र' प्रकाशनाचे श्री. माधव जोशी यांचे काल ठाण्यात निधन झाले. माधवरावांनी माझे तिसरे पुस्तक ‘आयसी 814 हायजॅकनंतर…’ प्रकाशित केले होते. त्यांचे आकस्मिक निधन धक्कादायक आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.
🙏🙏🙏 pic.twitter.com/FNl6dhc9zU— Dinesh Kanji (@DineshKanji) June 13, 2024
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ही माधव जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘राष्ट्रवादी विचारांचे साहित्य जन जनांपर्यंत पोहोचवण्याच्या जिद्दीने प्रकाशन क्षेत्रात दाखल झालेले, अल्पावधीत नावलौकिक कमावणाऱ्या ‘परममित्र’ प्रकाशनाचे सर्वेसर्वा श्री. माधव जोशी यांचे काल अल्पकालीन आजाराने ठाण्यात निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली.” अशी पोस्ट आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
राष्ट्रवादी विचारांचे साहीत्य जन जनांपर्यंत पोहोचवण्याच्या जिद्दीने प्रकाशन क्षेत्रात दाखल झालेले, अल्पावधीत नावलौकिक कमावणाऱ्या 'परममित्र' प्रकाशनाचे सर्वेसर्वा श्री. माधव जोशी यांचे काल अल्पकालीन आजाराने ठाण्यात निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🙏🙏 pic.twitter.com/RmCFykpeoY
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 13, 2024
हे ही वाचा:
मुबिना युसूफकडून हिंदू मुलीवर धर्मांतर करून तिच्या मुस्लिम मित्राशी लग्न करण्यासाठी दबाव!
३०० कोटींच्या मालमत्तेसाठी सासऱ्याची हत्या; मारेकऱ्यांना एक कोटीची सुपारी!
हत्या करण्यासाठी फॅन क्लबच्या सदस्याचा वापर!
संत, धर्माचार्यांकडून ओम प्रमाणपत्राला भक्कम समर्थन, मोहीमेला दिले शुभ आशीर्वाद
माधव जोशी यांच्या परममित्र प्रकाशनाने अनेक दर्जेदार पुस्तके वाचकांच्या भेटीला आणलेली आहेत. गजाजन मेहंदळे यांचे ‘शिवाजी: हिज लाईफ ऍण्ड टाईम्स’ यांचे पुस्तक परम मित्र प्रकाशनने प्रकाशित केलं असून या प्रक्रियेदरम्यान त्यांना धमक्या मिळाल्या होत्या. मात्र, तरीही हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. सत्याची मशाल त्यांनी नेहमीच तेवत ठेवण्याचे काम केले. संत साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम त्यांच्या प्रकाशनाने केले. तसेच लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका हे तीन खंड वर्ष १९२३, १९२५ आणि १९२७ साली प्रकाशित झाले होते. त्यानंतर २०२० साली तब्बल ९३ वर्षांनी या ग्रंथांची पुनर्निर्मिती परम मित्रने केली. त्यामुळे वाचकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्यात परम मित्र प्रकाशनाचा वाटा असतो.