दोन दिवसांपूर्वी राज्यात दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला. मात्र, दरम्यान सातव्या थरावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संदेश दळवी (वय २४) हा तरुण सातव्या थरावरून पडून त्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील विलेपार्ले येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
संदेश साळवी हा तरुण विलेपार्ले येथील शिवशंभो मंडळाच्या दहीहंडी पथकात होता. यावेळी तो सर्वात वरच्या म्हणजेच सातव्या थरात होता. हंडी फोडल्यानंतर एकाबाजूला तोल गेल्यामुळे संदेश खाली जमिनीवर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या डोक्यावर रविवारी शस्त्रक्रियाही पार पडली पण सोमवार, २२ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.
संदेश हा रिक्षा चालकाचे काम करत होता. तर त्याचे वडीलही रिक्षा चालक होते आणि त्याची आई ही घरकाम करते. दरम्यान, दुर्घटनेनंतर याप्रकरणी पोलिसांनी दहीहंडी आयोजकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
हे ही वाचा:
राकेश झुनझुनवाला ट्रस्टची जबाबदारी ‘या’ व्यक्तीच्या खांद्यावर
आता शिवसेनेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा
एम्स आता ओळखले जाणार ‘या’ नावाने
इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला केला आहे. तसेच दहीहंडी दरम्यान एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला तर शासनाकडून १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तर गोविंदा गंभीर जखमी झाला तर ७.५० लाख आणि त्याच्या अवयवाला गंभीर इजा झाली तर ५ लाख रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत.