उत्तराखंडमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या चार ट्रेकर्सचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सहस्त्रतालमध्ये ट्रेकसाठी गेलेले ट्रेकर वाईट हवामानामुळे अडकल्याची माहिती आहे. मोठ्या बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या ट्रेकर्सना वाचवण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर, मुसळधार बर्फवृष्टीत अडकलेल्या १३ ट्रेकर्सना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने बचाव पथक घटनास्थळी पाठवले आहे. हा भीषण अपघात उत्तरकाशी जिल्ह्यात घडला.
सहस्त्रताल ट्रेकसाठी गेलेल्या ट्रेकिंग ग्रुपमधील चार सदस्य खराब हवामानामुळे रस्ता चुकले. उर्वरित सदस्य या उंच हिमालयीन ट्रेक मार्गात अडकल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी डॉ. मेहरबान सिंग बिश्त यांनी एसडीआरएफ मुख्यालयाला ट्रॅकर्सना वाचवण्यासाठी तातडीने बचाव पथक पाठवण्याची विनंती केली. यात चार ट्रॅकर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, मुसळधार बर्फवृष्टीत अडकलेल्या १३ ट्रॅकर्सना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
हे ही वाचा:
घोषणा ‘४०० पार…’ची निकाल ३०० च्या आत… भाजपाचे गणित कुठे चुकले?
पुण्यात हरले मोरे-धंगेकर, जिंकले मुरलीधर!
अबब…अमित शहांचे लीड ७ लाखावर !
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये खणखणीत राणेंचे नाणे!
ट्रॅकिंग एजन्सीचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक राजेश ठाकूर यांनी मंगळवारी संध्याकाळी प्रशासनाला कळवले की, हिमालयन व्ह्यू ट्रॅकिंग एजन्सी, मणेरी मार्फत मल्ला-सिल्लावर-कुष्कल्याण-सहस्त्रताल ट्रेकसाठी २२ सदस्यांची टीम गेली आहे. ज्यामध्ये कर्नाटकातील १८ सदस्य, महाराष्ट्रातील एक सदस्य आणि तीन स्थानिक मार्गदर्शकांचा समावेश होता. २९ मे रोजी या टीमला सहस्त्रतालच्या ट्रेकिंग मोहिमेवर पाठवण्यात आले. ही ट्रॅकिंग टीम ७ जूनपर्यंत ट्रेक पूर्ण करून परतणार होती. दरम्यान, सहस्त्रतालला पोहोचत असतानाच खराब हवामानामुळे संघाचा रस्ता चुकला. संबंधित ट्रॅकिंग एजन्सीने तपासाअंती या टीममधील चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. अडकलेल्या इतर १३ सदस्यांना तातडीने बाहेर काढण्याची विनंती करण्यात आली आहे.