२६/११च्या हल्ल्याला चोख जवाब देणारा जवान गमावला

२६/११च्या हल्ल्याला चोख जवाब देणारा जवान गमावला

ब्लॅक कॅट कमांडो दत्त कालवश

नॅशनल सिक्युरिटी गार्डचे (एनएसजी) माजी महासंचालक आणि मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यात कमांडोचे नेतृत्व करणारे ज्योती कृष्ण दत्त यांचे गुरूग्राममध्ये कोरोनामुळे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांना गुरूग्रामच्या मेदांत हॉस्पिटलमध्ये १४ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्राणवायूची पातळी खालावत गेली आणि त्यांनी काल (१९ मे रोजी) अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा मुलगा नोएडा येथे काम करतो, तर मुलगी अमेरिकेत असल्याची माहिती मिळाली आहे.

दत्त हे १९७१ सालच्या बॅचचे पोलिस अधिकारी होते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये सेवा बजावली होती. ते एनएसजीचे ऑगस्ट २००६ ते फेब्रुवारी २००९ या काळात महासंचालक होते. त्याबरोबरच ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाशी देखील निगडित होते.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे दिखाऊपणा

भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा राहुल द्रविडकडे

केंद्र सरकारची प्रणाली असताना राज्याचा ‘जिरायती’ खर्च कोणासाठी?

रुग्णाच्या मृत्यनंतरही ३ दिवस उपचार सुरु, नांदेडमधील धक्कादायक प्रकार

त्यांच्या कारकीर्दीत मुंबईतील २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो करण्यात आले होते.

त्यावेळी दत्त यांनी २०० ब्लॅक कॅट कमांडोंचे नेतृत्व केले होते. एआरसीच्या विशेष आयएल-७६ या विमानाने मुंबईत उतरलेल्या विशेष विमानातून उतरलेल्या या कमांडोंनी दहशतवादविरोधी कारवाईला प्रारंभ केला होता. त्याचे नेतृत्व दत्त यांनी केले होते.

या दलाने १० लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. ही एकूण कारवाई सुमारे ६० तास चालली होती. या हल्ल्यास परदेशी नागरिक मिळून १६६ लोक मारले गेले आणि ३०० पेक्षा अधिक जखमी झाले होते.

एनएसजीने याबाबत ट्वीट केले आहे.

Exit mobile version