माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांचे दिल्लीत कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. मृत्युसमयी ते ७० वर्षांचे होते.
दिलीप गांधी हे भाजपाचे नगर मतदारसंघातील खासदार होते. गांधी सलग तीन वेळा अहमदनगर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. ते १९९९ मध्ये खासदार होते. २००३ ते २००४ या काळात त्यांनी केंद्रातील जहाजबांधणी मंत्रालयाचे राज्यमंत्री पद सांभालले होते. पक्षातील वरिष्ठ वर्तुळाशी त्यांचा चांगला संपर्क होता. गेल्या निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती.
हे ही वाचा:
भाजपाच्या ‘या’ खासदाराची आत्महत्या?
मथुरा, काशी आणि घुबडांचे चित्कार
नगर शहराच्या राजकारणातही त्यांचे चांगले वजन होते. पक्षासाठी त्यांनी बराच काळ नगर शहरजिल्हाध्यक्ष राहिले होते. त्याबरोबरच ते बराच काळ नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष देखील होते. खासदार असताना त्यांनी नगर शहराबरोबरच ग्रामीण भागासाठी देखील अनेक उपाययोजना राबवल्या होत्या.
कट्टर हिंदुत्ववादी नेता आणि कट्टर कार्यकर्ता अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनामुळे कट्टर हिंदुत्त्ववादी नेता गमावल्याचे दुःख व्यक्त केले जात आहे.
या बाबत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी ट्वीटर वरून श्रद्धांजली वाहिली आहे.
पूर्व केंद्रीय मंत्री व पार्टी के वरिष्ठ नेता श्री दिलीप गांधी जी के निधन का दुःखद समाचार प्राप्त हुआ। दिलीप जी का पूरा जीवन जनता की सेवा व संगठन कार्यों में समर्पित रहा। ईश्वर उनके परिजनों को यह असहनीय पीड़ा सहने की शक्ति प्रदान करे। ॐ शांति शांति शांति
— Amit Shah (@AmitShah) March 17, 2021