कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून ठेवला जात आहे. वाशिम लेडी हार्डिंग कोव्हिड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे इतर रुग्णांची तब्येतही बिघडत असल्याचा आरोप केला जात आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याबाबत काही नियम आहेत. मात्र दोन दिवस आधी मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाला बेडशीटमध्ये झाकून ठेवलं जात असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. वाशिम लेडी हार्डिंग कोविड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या या हलगर्जीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या इतर रुग्णांच्या तब्येतीतही बिघडत असल्याच्या आरोप रुग्णांच्या नातेवाईकांमधून होत आहे. याआधीही कोरोनाग्रस्त मृतदेह गुंडाळण्यासाठी पैशांची मागणी करणे किंवा कोरोना रुग्ण स्वतः जेवणाचा डबा घेण्यासाठी बाहेर जात असल्याचा प्रकार माध्यमांनी उघडकीस आणला आहे.
हे ही वाचा:
राज ठाकरेंनी पुन्हा लिहिले मोदींना पत्र
एसटीच्या फेऱ्या कमी होणार- अनिल परब
प्रायव्हसी पॉलिसी प्रकरण, दिल्ली उच्च न्यायालयाने फेसबूक आणि व्हॉट्सऍप्पची याचिका फेटाळली
माकप नेते सीताराम येचुरींच्या मुलाचे कोरोनामुळे निधन
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील भयावह चित्र समोर आलं आहे. स्मशानभूमी खचाखच भरल्याने मृतदेहांना अग्नी देण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे रहिवासी कॉलनीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, “अंत्यसंस्कारानंतर चितेला दिलेल्या अग्नीची राख आसपास असलेल्या घरांजवळ पसरली. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर प्रशासनही खडबडून जागं झालं असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती कोरोनाबाधित होता, मात्र त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.