भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टनमध्ये होणारा पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करावा लागला. आज होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यातही ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. परंतु पावसाच्या मेहरबानीने हा सामना सुरू झाला. भारतात या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी ॲमेझॉन प्राईम व्डिडिओद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंग झाले. पण यासाठी तुम्हाला ॲमेझॉनला पैसे मोजावे लागले. तुम्ही जर हा सामना पाहण्यासाठी ॲमेझॉनला प्राधान्य देत असाल. तर ती तुमची मोठी चूक ठरणार आहे. कारण हा सामना दूरदर्शनवर मोफत दाखवला जातोय, तेही अगदी मोफत. पैसे मोजूनही हा सामना ॲमेझॉनच्या तुलनेत डीडी स्पोर्ट्स तब्बल पाच मिनिटे प्रक्षेपणात पुढे आहे.
नाणेफेक जिंकून पाहुण्या भारताला प्रथम फलंदाजीसाठी न्यूझीलंडने आमंत्रित केले. भारताने त्याचा फायदा उठवत सहा गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावा वसूल केल्या. त्यात भारताचा ३६० फलंदाज सूर्यकुमार यादव याने मैदानाच्या चारोओर फटाकेबाजी करत ५१ चेंडूत १११ धावा चोपून काढल्या. त्यात सूर्यकुमारच्या ७ गगनभेदी षटकारांचा समावेश आहे. सूर्याने या खेळीत ११ चौकारही लगावले. इतर फलंदाज एकामागोमाग तंबूत परतत असताना सूर्या मात्र तळपत राहिला आणि त्याने धावांचा रतीब घातला. ईशान किशनच्या ३६ धावांचा अपवाद वगळता इतर फलंदाज एकामागोमाग तंबूत परत असतानाही सूर्याच्या प्रकोपात किवीचे गोलंदाज होरपळून निघाले.
हेही वाचा :
वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा पाकिस्तानात मृत्यू
‘पराभवाच्या भीतीने राहुल गांधी प्रचारात नाहीत’
कर्नाक पूल तोडण्यासाठी मध्य रेल्वेचा २७ तासांचा मेगाब्लॉक
ओटीटीच्या जमान्यात प्रेक्षकांचा डीडी स्पोर्ट्सकडे कानाडोळा होतोय. तुम्हीही तेच करत असाल तर लक्षात असू द्या. भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी तुम्ही ॲमेझॉनला प्राधान्य देत असाल तर तुमच्या खिशाला कात्री बसणार हे मात्र नक्की. कारण तुम्ही हाच सामना दूरदर्शनच्या डीडी स्पोर्ट्सवर अगदी मोफत पाहू शकणार आहात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा सामना ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या प्रक्षेपणाच्या आधी दूरदर्शनवर ५ मिनीटे आधी तुम्ही पाहू शकणार आहात. मग विचार कसला करताय तुम्ही खरे क्रिकेटप्रेमी असाल आणि तुम्हाला हा सामना बघायचा आहे आणि तोही अगदी वेळेत आणि मोफत. मग रिमोट उचला आणि डीडी स्पोर्ट्स लावून सामन्याचा आनंद लुटा.