30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषदेवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिष्टाईमुळे कुवेतमध्ये अडकलेल्या युवकाची झाली सुटका

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिष्टाईमुळे कुवेतमध्ये अडकलेल्या युवकाची झाली सुटका

आमदार उमा खापरे यांच्याशी या युवकाने संपर्क साधून मदत मागितली होती

Google News Follow

Related

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिष्टाईमुळे कुवेतमध्ये अडकलेल्या एका युवकाची सुटका झालीये. सागर संकपाळ असं या युवकाचं नाव आहे. हा युवक १५ सप्टेंबर रोजी नाशिक येथील एजन्सीमार्फत कुवेत येथे नोकरीसाठी गेला होता. तेथे गेल्यानंतर त्याच्याबाबत कायदेशीर घटना घडल्या, त्यानंतर त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आणि त्याची कागदपत्रे आणि मोबाईल फोन जप्त केला. सागरने आपला भाऊ रोहित याच्या मदतीने आमदार उमा खापरे यांच्याशी संपर्क साधला व मदत मागितली. आमदार खापरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. फडणवीस यांनी विदेश मंत्रालयाशी संपर्क साधून सागरच्या सुटकेसाठी प्रयत्न केले.

खापरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली. त्यांच्या सल्ल्यानुसार, खापरे यांनी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला आणि १ नोव्हेंबर रोजी लेखी तक्रार केली. त्याची दखल घेत परराष्ट्र मंत्रालयाने कुवेत येथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सागर संकल्पला गुरुवारी कुवेतहून पुण्याला पाठवण्यात आले.

सागर संकपाळ याने आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले असून यापूर्वी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विविध कंपन्यांमध्ये काम केले आहे. नोकरी डॉट कॉम या वेब पोर्टलशी संपर्क साधून कुवेतमध्ये बेडिंग ऑपरेटर पदासाठी गेल्या वर्षी त्याने अर्ज केला होता. नाशिक येथील संबंधित एजन्सीने त्याला १५ सप्टेंबर २०२२ रोजी कुवेत येथील कारखान्यात नोकरीसाठी पाठवले. त्यानंतर १६ सप्टेंबरपासून दीड महिना काम केले. त्यानंतर कंपनीने त्याला पंधरा दिवसांचा पगार दिला.

हे ही वाचा:

सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात

गुजरातमध्ये काँग्रेसच्या १५ दिवसांत २५ रॅली

बाबा रामदेव यांना धक्का; पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी

मुंबईसह ठाणे पोलीस दलात मोठा फेरबदल

प्रकृती खालावल्याने त्याला तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कुवेतमध्ये रस्त्यावर फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक करून पोलीस ठाण्यात नेले. यानंतर त्याचा कुटुंबाशी संपर्क तुटला, पोलिसांनी त्याची सर्व कागदपत्रे आणि मोबाईल फोन जप्त केले. यानंतर रवानगी तुरुंगात करण्यात आली. पोलिसांनी मारहाण केली. काही दिवसांनी मोठा भाऊ रोहितने आमदार उमा खापरे यांच्याशी संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि माझी सुटका झाली.

आमदार खापरे यांनी सर्व परिस्थिती समजून घेऊन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करून माझ्या भावाला सुखरूप पुण्यात आणण्यास मदत केली. आमचे संकपाळ परिवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार उमा खापरे आणि कुवेत येथील भारतीय दूतावासाचे आभार मानतो असे रोहित याने सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा