भारतासह जगातील सर्व देश कोविडचा सामना करत आहे. अशावेळेस त्याच्या प्रतिकारासाठी लसीकरण हा प्रमुख उपाय असल्याचे समोर आले आहे. भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम चालवत आहे. भारतात लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन लसी प्रामुख्याने वापरल्या जात आहेत. या दोन्ही लसींबाबत डीसीजीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही दोन मात्रांच्या लसी आहेत. या दोन्ही लसींनी त्यांची उपयुक्तता सिद्ध केली आहे. डीसीजीआयने या दोन्ही लसींच्या मिश्र वापरासाठी अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मान्यता देखील दिली आहे. या बाबतीतील तज्ज्ञांच्या समितीने देखील २९ जुलै रोजी या प्रकारच्या वापराला मान्यता दिली होती.
तज्ज्ञांच्या समितीने देखील सीएमसी वेल्लोर, तमिळनाडू यांनी चौथ्या क्लिनीकल चाचणी घेण्यासाठी परवानगी दिली आहे. ही चाचणी सुमारे ३०० लोकांवर घेण्यात येणार आहे. निरोगी ३०० लोकांना एक कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनची एक एक मात्रा देण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
मंत्री उदय सामंतांचा भाऊ कोकणचा सचिन वाझे?
अनुपस्थित खासदारांचा मोदी घेणार तास?
औरंगाबादमधील उद्योगांवर ‘गुंडां’तर
या अभ्यासातून कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनची एक एक मात्रा घेतलेल्या लोकांचा अभ्यास केला जाणार आहे. त्याद्वारे निष्कर्ष काढण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशात काही नागरिकांना चुकीने दोन वेगळ्या लसी देण्यात आल्या होत्या. त्या लोकांचा अभ्यास आयसीएमआर करत आहे, त्यापेक्षा हे संशोधन वेगळे आहे.
या सोबत तज्ज्ञांच्या समितीने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि हैदराबादमधील आणखी एका कंपनीच्या नाकाद्वारे द्यायच्या लसीच्या मिश्र वापराच्या अभ्यसासाठी परवानगी दिली आहे.