स्पुटनिक लाइट सिंगल-डोस लसीला आपत्कालीन वापराची परवानगी

स्पुटनिक लाइट सिंगल-डोस लसीला आपत्कालीन वापराची परवानगी

भारतीयांना आता कोरोना विरुद्धची लढाई लढण्यासाठी आणखी एक लस मिळणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) भारतात स्पुटनिक लाइट सिंगल-डोस लसीला आपत्कालीन वापराची परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी यासदंर्भात माहिती दिली आहे.

मनसुख मांडविया यांनी ट्विट करत लसीला परवानगी मिळाल्याचे सांगितले. तर स्पुटनिक ही देशातील ९ वी कोरोना लस आहे. स्पुटनिक लाईट सिंगल डोसमुळे कोरोना महामारीविरुद्ध लढा आणखी मजबूज होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील ६५ टक्के मुलांना कोरोनाची पहिली लस देण्यात आल्याचे मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सांगितले होते. यंग इंडियाचा ऐतिहासिक प्रवास सुरुच आहे. देशात अवघ्या एका महिन्यात १५ ते १८ वर्षे वयोगटातील ६५ टक्के मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम नवीन विक्रम निर्माण करत आहे, असे ट्विट मनसुख मांडविया यांनी केले आहे.

सध्या १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असून आरोग्य कर्मचारी आणि वृद्धांसाठी बूस्टर डोस देणे सुरू आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार २४ तासांत लसीचे ५५ लाखाहून अधिक डोस देण्यात आले असून, देशात आतापर्यंत १६८.४७ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

फिरकीसमोर वेस्ट इंडीजने गुडघे टेकले; हजाराव्या सामन्यात भारताचा दमदार विजय

….आणि हेमा झाली स्वरकोकिळा लता मंगेशकर

लता दीदी अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हृदयाची तार छेडणारा तारा निखळला

गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू झाली होती. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले होते. नंतरच्या टप्प्यात वेगवेगळ्या वयोगटांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेदरम्यान भारताने लसीकरणाचे अनेक नवनवे विक्रम रचले.

Exit mobile version