उत्तर प्रदेशातील जलालाबादमध्ये आपल्या भाच्याच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या मुंबईतील ३५ वर्षीय निहाल खान याची बुधवारी गोळी झाडून हत्या करण्यात आली. निहाल खान हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याचा मेहुणा आहे. कुटुंबाच्या सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. निहाल हा जलालाबादचे अध्यक्ष शकील खान याच्या बायकोचा भाऊही होता.
हे ही वाचा:
युक्रेन-रशिया संघर्षापासून दूर राहा
‘राहुल गांधी यांना भेटण्यासाठी १० किलो वजन कमी करण्यास सांगितले गेले’!
संदेशखालीत शाहजहान शेखच्या भावाची मालमत्ता ग्रामस्थांनी जाळली, पुन्हा हिंसाचार!
संदेशखाली वादात शाहजहान शेखवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल!
सन २०१६मध्ये निहाल हा शकीलच्या भाचीसोबत पळून गेला होता. त्यानंतर दोघांमध्ये समेट झाली होती. ‘निहालचे १५ फेब्रुवारी रोजीचे विमान चुकले होते. त्यामुळे तो रस्तेमार्गे आला होता. मला वाटते, माझा भाऊ कामिल अजूनही २०१६च्या या प्रकरणाबाबत अजूनही निहालशी नाराज होता आणि त्याला त्याचा बदला घ्यायचा होता,’ अशी शक्यता शकील याने व्यक्त केली.