31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषजिवंत आहे दाऊद इब्राहिमचा शत्रू, ९ वर्षांनंतर छोटा राजनचे फोटो आले समोर!

जिवंत आहे दाऊद इब्राहिमचा शत्रू, ९ वर्षांनंतर छोटा राजनचे फोटो आले समोर!

तिहार जेल मध्ये आहे सध्या कैद

Google News Follow

Related

दाऊद इब्राहिमचा कट्टर शत्रू आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचे नवे फोटो समोर आले आहेत.२०१५ मध्ये छोटा राजनला भारतीय गुप्तचर यंत्रणांनी परदेशात पकडले होते.त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले.आता समोर आलेले फोटो हे २०१५ नंतरचे आहेत.सध्या तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद आहे.

आता सध्या जे त्याचे फोटो समोर आले आहेत, ते सुद्धा २०२० सालचे आहेत.त्यावेळी मीडियामध्ये छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.त्यावेळी त्याला तातडीने उपचारासाठी दिल्लीतील अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थेत (AIMS) भरती करण्यात आले होते.तेव्हाच्या अँम्ब्युलन्स व्हॅनमधील आणि उपचारादरम्यानची त्याची छायाचित्र आता समोर आली आहेत. सध्या तो तिहार तुरुंगात क्रमांक २ च्या बरॅकीत आहे.

एक काळ असा होता जेव्हा छोटा राजन हा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा मानला जात होता आणि त्याने दोन दशकांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा दिला होता. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाला.यानंतर दोघांच्या दोन टोळ्या निर्माण झाल्या आणि यामध्ये मुंबई, दुबई, नेपाळपर्यंत अनेकांना जीव गमवावा लागलादाऊदचा जवळचा मित्र छोटा शकील अजूनही छोटा राजनवर हल्ला करण्याची योजना आखत आहे.

हे ही वाचा:

शतक झळकावल्यानंतर ट्रॅव्हिस हेडचे ‘नो सेलिब्रेशन’

पाकिस्तानला झटका; आझम खान टी-२० मालिकेतून बाहेर

दहशतवाद्यांसाठी काम करणाऱ्या मुख्याध्यापकाला पूंछमध्ये अटक!

शिवम दुबेची पत्नी अंजुम खान ‘धोनीची फॅन’

छोटा राजनला २५ ऑक्टोबर २०१५ रोजी इंडोनेशियातील बाली शहरातून अटक करण्यात आली होती.त्यावेळी त्याचा एक फोन कॉल त्याला भारी पडला होता.नेहमी VoIP द्वारे कॉल करणाऱ्या राजनने २४ ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांच्या एका हितचिंतकाला व्हॉट्सॲपद्वारे कॉल केला. हा कॉल सुरक्षा यंत्रणांनी टेप केला .छोटा राजनने फोनवर सांगितले होते की, तो आता ऑस्ट्रेलियात सुरक्षित नाही आणि लवकरच बाहेर पडण्याची योजना आखत आहे.
यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि ही संपूर्ण माहिती इंटरपोलला दिली.

२५ ऑक्टोबर २०१५ रोजी ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी एक भारतीय प्रवाशी बाली या शहरासाठी निघाल्याची माहिती दिली. याची माहिती तात्काळ इंटरपोलला देण्यात आली.यानंतर बाली विमानतळावर पोहचताच राजनला अटक करण्यात आली.अटकेच्या वेळी छोटा राजन खूप घाबरला होता.त्यावेळी दाऊद इब्राहिम आपल्या जीवावर उठलाय असे स्वतः त्याने सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा