डेव्हिड विलीने लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडली; मॅट हेन्रीची एण्ट्री

डेव्हिड विलीने लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडली; मॅट हेन्रीची एण्ट्री

आयपीएल २०२४ च्या सामन्यांचा रंग चढत असतानाच इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीने लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडली आहे. आयपीएल २०२४ साठी विलीला लखनौने २ कोटी रुपयांना विकत घेऊन आपल्या ताफ्यात घेतले होते. पण आता त्याने वैयक्तिक कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे. विलीच्या जागी लखनौने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीचा संघात समावेश केला आहे.

हेन्रीला सुपर जायंट्सने सव्वा कोटी रुपयांच्या बेस प्राइसवर करारबद्ध केले आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी लखनौ सुपर जायंट्ससोबत करार केला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीच्या जागी हेन्रीला संधी देण्यात आली आहे. हेन्री १.२५ कोटी रुपयांच्या बेस प्राइसवर संघात सामील झाला आहे.

मॅट हेन्री यापूर्वीही आयपीएलमध्ये सहभागी झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज या दोन संघामध्ये त्याचा समावेश होता. हेन्रीने आयपीएलमध्ये दोन सामने खेळले आहेत. जे तो २०१७ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळला होता.

हेही वाचा :

इंजिनीअरच्या हत्येनंतर चीनने थांबवले पाकिस्तानमधील धरणाचे बांधकाम

एनआयएकडून आठ टीएमसी नेत्यांना समन्स

लातूरमध्ये काँग्रेसला धक्का; काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या सुनेच्या हाती ‘कमळ’

लातूरमध्ये काँग्रेसला धक्का; काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या सुनेच्या हाती ‘कमळ’

न्यूझीलंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा गोलंदाज
विशेष म्हणजे मॅट हेन्री हा न्यूझीलंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा गोलंदाज आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत २५ कसोटी, ८२ वनडे आणि १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या ४९ डावांत गोलंदाजी करताना त्याने ३२.४१ च्या सरासरीने ९५ जणांना बाद केले आहे. ३३ डावात फलंदाजी करताना ६०० धावा केल्या आहेत. वनडेच्या ८० डावात गोलंदाजी करताना हेन्रीने ३५ डावात २६.४ च्या सरासरीने १४१ विकेट्स घेतल्या आहेत आणि २५५ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने टी-२० इंटरनॅशनलच्या १६ डावांत २० विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याने ८.१३ च्या इकॉनॉमीमधून धावा केल्या आहेत.

Exit mobile version