नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने मोठी घोषणा केली आहे.वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.या सामन्याच्या दोन दिवस अगोदर वॉर्नर हा मोठा निर्णय घेतला आहे. भारतात खेळवण्यात आलेल्या २०२३ च्या वनडे वर्ल्डकपदरम्यानच ३७ वर्षीय वॉर्नरने निवृती घेण्याचा विचार केला होता.
वॉर्नर म्हणाला की, पत्नी कँडिस आणि माझ्या ३ मुलींना मला जास्ता वेळ देण्याची गरज आहे. तथापि, २०२५ मध्ये पाकिस्तानात खेळवण्यात येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला तगड्या सलमीवीराची गरज पडली तर संघात परतेन असेही वॉर्नरने स्पष्ट केले. तो पुढे म्हणाल की, मला माहिती आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे, जर मी २ वर्षानंतरही क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकलो आणि संघाला कोणाची गरज लागली तर मी संघासाठी कधीही उपलब्ध असेन, असे वॉर्नर सांगितले.
डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १६१ सामने खेळत ६९३२ धावा केल्या आहेत.त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९७.२६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. यामध्ये २२ शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. डेव्हिड वॉर्नरने २००९ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. होबार्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा सामना खेळवण्यात आला होता. रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट, मायकल क्लार्क आणि स्टिव्ह वॉ यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नच्या नावावर आहे.
हे ही वाचा:
मोदीच येणार! द गार्डीयनचाही दावा
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपान भूकंपाच्या धक्क्याने हादरलं!
बाबरीचे पक्षकार अंसारी म्हणतात, पंतप्रधान मोदींनी अयोध्येचे रुपडे पालटले!
इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!
विश्वचषक २०२३ मध्ये वॉर्नरची दमदार कामगिरी
२०२३ च्या वर्ल्डकपमध्ये डेव्हिड वॉर्नरने दमदार कामगिरी केली आहे. डेव्हिडने ऑस्ट्रेलियाच्या संघातून सर्वाधिक धावा केल्या. वॉर्नरने वर्ल्डकपमध्ये ११ सामने खेळले. त्याने वर्ल्डकपमध्ये १०८.२९ च्या स्ट्राईक रेटने ५३५ धावा काढल्या. यामध्ये दोन शतकांचाही समावेश होता. त्याने पाकविरुद्धच्या सामन्यात १६३ धावांची खेळी केली होती. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता.
आतापर्यंत १११ कसोटी सामने खेळले आहेत
वॉर्नरने आतापर्यंत १११ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ४४.५८ च्या सरासरीने ८६९५ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २६ शतके आणि ३६ अर्धशतकांची नोंद आहे.दरम्यान,वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही डेव्हिड वॉर्नर टी २० क्रिकेट खेळतच राहणार आहे.