25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषमाझ्या पप्पांचा पगार द्या! वेतन नसलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीची आर्त हाक

माझ्या पप्पांचा पगार द्या! वेतन नसलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीची आर्त हाक

Google News Follow

Related

एसटी कर्मचाऱ्यांची वेतनाविना सुरू असलेली परवड रोज जगजाहीर होऊ लागली आहे. कधी कुणी पत्र लिहून तर कुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडत आहे. आता एका मुलीने आपल्या एसटीत नोकरीस असलेल्या आपल्या वडिलांना कोणत्या अवघड मानसिक स्थितीतून जावे लागत आहे, याची विदारक कहाणी मांडली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील एसटी कर्मचारी प्रमोद पंदरे यांची मुलगी हर्षदा हिने थेट व्हीडिओ बनवूनच आपल्या वडिलांची दुर्दैवी कहाणी कथन केली आहे. ही मुलगी म्हणते की, गेल्या दोन महिन्यांपासून माझ्या वडिलांना पगारच मिळालेला नाही. पगार नसल्याने माझे पप्पा माझे विचारात पडलेले असतात. आमच्याशी बोलत नाहीत. विचारले तर रागावतात. नाहीतर मी पगार नसल्यामुळे खूप चिंतेत आहे असे सांगतात. आमच्या ट्युशनचे पैसेही ते देऊ शकत नाहीत. आता आम्ही काय करावे हे आम्हाला परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगावे.

हे ही वाचा:

पॅरालिम्पिकमधील एका मराठमोळ्या ‘योद्ध्या’ची कहाणी

काबुल विमानतळावर पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला

अफगाणिस्तानात बँका बंद; सर्वसामान्यांकडे पैशांचा खडखडाट

अनिल देशमुखांना क्लिन चीट दिलेलीच नाही!

हर्षदा म्हणते की आमची एकच विनंती आहे, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरात लवकर करा. आमची तुम्हाला विनंती आहे की, पगार ताबडतोब द्या नाहीतर आमचे पप्पाही काही चुकीचे पाऊल उचलतील अशी भीती आम्हाला वाटते. घरातील सगळे धान्य संपले आहे, महागाई वाढली आहे. एक महिन्यापासून माझे पप्पा काहीच बोलत नाहीत, रात्री एकटेच उठून बसतात. आम्ही पप्पांना असे टेन्शनमध्ये बघू शकत नाही. म्हणून माझी एकच विनंती आहे की, माझ्या पप्पांचा पगार लवकरात लवकर करा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा