बॉलीवुड, हॉलीवुडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि प्रसिद्ध गायक निक जोनास यांच्या घरी कन्या रत्न जन्माला आले आहे. प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी या बद्दलची अधिकृत घोषणा केली आहे. सरोगसी तंत्रज्ञानाचा वापर करून हे बाळ जन्माला आले असून ‘या काळात आमच्या कौटुंबिक गोष्टींसाठी आम्हाला एकांत द्यावा’ अशी विनंती या सेलिब्रेटी दांपत्याने आपल्या सर्व चाहत्यांना केली आहे.
पण अशातच प्रियांका आणि निकच्या बाळाबद्दल एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. डेली मेल या वर्तमानपत्राचा हवाला देऊन टाईम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. डेली मेलच्या सूत्रांनुसार प्रियांका आणि नीक जोनास यांची मुलगी ही प्रि मॅच्युअर बेबी असल्याचे म्हटले जात आहे. म्हणजेच अपेक्षित वेळेच्या आधीच या बाळाचा जन्म झाला आहे.
हे ही वाचा:
‘विहंग गार्डन दंडमाफी बेकायदेशीर, घटनाविरोधी’
फेक न्यूज पसरवणाऱ्या पाकिस्तानी वेबसाईट आणि यूट्यूब चैनल्सवर भारत सरकारची कारवाई
मुंबईतील भाटिया रूग्णालयाजवळील इमारतीला भीषण आग; १५ जखमी
एन्काउंटर स्पेशालिस्ट ए ए खान यांचे निधन
डेली मेलच्या बातमीनुसार प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे बाळ एप्रिल महिन्यात जन्माला येणे अपेक्षित होते. त्यानुसारच सर्व नियोजन करण्यात आले होते. बाळाच्या संगोपनाच्या दृष्टीने प्रियांका चोप्रेने आपल्या कामाचे वेळापत्रक आखले होते. शुटिंगच्या तारखा त्या प्रमाणे ठरल्या होत्या. पण या बाळाचा जन्म अपेक्षित वेळेच्या आधीच झाला.
अपेक्षित वेळेच्या तब्बल १२ आठवडे म्हणजे तीन महिन्यातील हे बाळ जन्माला आले असल्याचे डेली मेलच्या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे या बाळाची प्रकृती स्थिर होईपर्यंत ते हॉस्पिटलमध्येच असेल आणि नंतरच ते प्रियांका चोप्रा निक जोनास यांना सुपूर्त करण्यात येणार आहे.