रा.स्व. संघाचे कार्यकर्ते असलेले नारायण दाभाडकर यांनी प्राणांची दिलेली आहुती हा संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. स्वतःच्या जीवाचा विचारही न करता एका गरजवंताला आपला बेड उपलब्ध करून देणाऱ्या दाभाडकर काकांच्या त्यागाला केवळ महाराष्ट्राने नाही तर अवघ्या देशाने सलाम केला.
त्याचवेळी रा. स्व. संघाच्या एका निस्सीम कार्यकर्त्याची स्तुती करावी लागेल, या विचारामुळे पोटशूळ उठलेल्यांनी हे सगळे कसे खोटे आहे हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगण्याचा प्रयत्नही केला. त्यासाठी खोटेनाटे पुरावे, दाखले देऊन पाहिले. लोकसत्ताने या विषयात एक फॅक्ट चेक केले आणि तेही एका खोत्र्य ट्विटच्या आधारे. जे ट्ववीट नंतर डिलीट केले गेले. एबीपी माझा वाहिनीचे खोटे स्क्रीनशॉट्स फिरवले गेले. जे खोटे असल्याचा खुलासा खुद्द वाहिनीने केला आहे.
पण काही संघविरोधी लोकांचा अपप्रचार इतका वाढला की दाभाडकर यांच्या मुलीला आपला पितृशोक बाजूला ठेवून व्हिडीओ करून घडला प्रकार सांगीतला. काकांची मुलगी आसावरी यांनी आपले मनोगत मांडणारा व्हीडिओ जारी केल्यानंतर मात्र या सगळ्यांची तोंडे बंद झाली. त्यांनी आपल्या या व्हीडिओतून त्या दिवशी नेमके काय घडले? का दाभाडकर काकांनी आपला बेड एका गरजवंताला मिळावा याचा विचार केला, याची करुण कहाणी विषद केली.
त्यावेळची नेमकी परिस्थिती काय होती? काकांच्या नेमक्या भावना काय होत्या? त्यांनी तो निर्णय घेताना नेमका काय विचार केला होता या सगळ्या गोष्टी या व्हिडिओतून स्पष्ट कारण्यातग आल्या आहेत