भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव तसेच ७७ वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील दीक्षांत सभागृहात पार पडला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी शिक्षण संस्थांचे प्रमुख, समाज सेवक तसेच प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या निवडक मान्यवरांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक IRS समीर वानखेडे यांचाही सन्मान करण्यात आला आहे. एनसीबीमध्ये कार्यरत असताना समीर वानखेडे यांनी अनेक मोठ्या धडक कारवाया केल्या होत्या.
Hon’ble Shri. @BSKoshyari Ji, In the presence of Union Minister Hon’ble Shri. @RamdasAthawale Ji for excellent work & contribution in the society for the justice to the deprived people.
Jai Hind 🇮🇳 #sameerwankhede pic.twitter.com/APXPxfVGtT— Sameer Wankhede (@swankhede_IRS) July 9, 2022
मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील दीक्षांत सभागृहात यावेळी दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत नागार्जुन आर्य सुरई ससाई, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ अनिल पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, एचएसएनसी बोर्डाचे विश्वस्त किशु मनसुखानी, अधिकारी समीर वानखेडे यांसह विविध मान्यवरांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानला कॉर्डेलिया क्रूझवरून ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडे हे अधिक चर्चेत आले होते. त्यांनी आर्यन खानला ताब्यात घेतले होते. राज्यातील तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान यालाही एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर खासगी आरोप करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आर्यन खान याला या प्रकरणी क्लीन चीट मिळाली पुढे मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची बदली चेन्नईमध्ये करण्यात आली. DG TS म्हणजे करदाते सेवांचे महासंचालक बनवण्यात आले आहे.
हे ही वाचा:
एलन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सचा ट्विटर खरेदी करार केला रद्द!
गीता गोपीनाथ ‘आयएमएफ’च्या भिंतीवर झळकलेल्या पहिल्या महिला अर्थशास्त्रज्ञ
शिंदे- फडणवीस सरकारकडून मराठा समाजासाठी ३० कोटींचा जीआर
“इस्लाम, ख्रिश्चनांचा अपमान अपमान; हिंदूंच्या झालेल्या अपमानाचं काय?”
तसेच सन्मान आणि सलाम फाऊंडेशनच्यावतीने उत्तराखंडमधील शहीदांच्या कुटुंबीयांसाठी डेहराडून येथे सहावा सन्मान आणि सलाम पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून समाजासाठी केलेल्या विशिष्ट सेवेबद्दल समीर वानखेडे यांना पुरस्कार मिळाला आहे.
Honoured to received an award from Governor of Uttarakhand Hon’ble Lt Gen. Shri @LtGenGurmit Ji and Union Minister Hon’ble Shri @RamdasAthawale Ji for distinguished service for the society. Jai Hind 🇮🇳#sameerwankhade pic.twitter.com/br0PcUC5at
— Sameer Wankhede (@swankhede_IRS) July 8, 2022