सदाबहार, रुबाबदार क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन

मागणी तसा षटकारांचा पुरवठा करणारा खेळाडू

सदाबहार, रुबाबदार क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन

मैदानावरच्या मुक्त वावराप्रमाणेच मैदानाबाहेर आपल्या दिलखुलास, गुलछबू वागणुकीमुळे प्रसिद्ध असलेले क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले.

दुर्राणी हे अवघ्या २९ कसोटीत खेळले आणि त्यात त्यांनी ७५ बळीही घेतले तसेच १२०२ धावाही केल्या पण त्या आकड्यांपेक्षाही त्यांची प्रतिमा ही प्रेक्षकांचे मनमुराद मनोरंजन करणारा खेळाडू म्हणून होती. लोकांनी मागणी करावी आणि षटकार खेचावा अशी त्यांची ख्याती होती. सर्वोत्तम फलंदाजाला आपल्या फिरकीच्या जोरावर बाद करण्याची पैज जिंकणारा गोलंदाज म्हणूनही त्यांना ओळखले जात होते. गॅरी सोबर्स यांना बाद करण्यासाठी कर्णधार अजित वाडेकर यांच्याकडून गोलंदाजी मागून घेतल्याबद्दल दुर्राणी ओळखले जात.

मैदानात मनोरंजन करणारे खेळाडू म्हणून दुर्राणी यांनी जशी ओळख होती तशीच मैदानाबाहेरही एक मोकळेढाकळे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा रुबाब होता. उंची मद्य, गोल्ड फेल्क्स सिगारेटचे झुरके…अगदी हर फिक्र को धुए मे उडाता चला गया पद्धतीची त्यांची जगण्याची पद्धत होती. ते आपल्याच तंद्रीत मस्त असलेले व्यक्तिमत्त्व होते.

हे ही वाचा:

चैत्र वारीमुळे पंढरपुरात होणार ४ ते ५ लाख भाविकांची मांदियाळी

कोर्टाने कोश्यारींची बाजू घेतली कुणी नाही दाखविली!

भरारी.. १५,९२० कोटी रुपयांची विक्रमी संरक्षण साहित्यांची निर्यात

देशात ४० हजार पेक्षा जास्त जणांनी केले सरोवरांचे अमृत प्राशन

काबुल, अफगाणिस्तान येथे त्यांचा जन्म झाला होता. पण नंतरचे आयुष्य गुजरातमधील जामनगर येथे व्यतित झाले. सौराष्ट्र, गुजरातकडून ते खेळले. जानेवारी महिन्यात ते पडले आणि त्यांच्या मांडीचे हाड मोडले. त्यातून ते सावरू शकले नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्राणी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून आपल्याला दुर्राणी यांच्याशी संवाद साधण्याचीही संधी मिळाली होती. गुजरात, सौराष्ट्र या संघांकडून ते खेळले याचा आम्हाला विशेष अभिमान आहे, असे पंतप्रधानांनी ट्विट केले आहे.

Exit mobile version