एकनाथ शिंदे यांच्या तिसऱ्या टिझरमध्ये ‘दहातोंडी रावण’

दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू

एकनाथ शिंदे यांच्या तिसऱ्या टिझरमध्ये ‘दहातोंडी रावण’

दसरा मेळाव्यासाठी सध्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटामध्ये टिझर युद्ध पेटले आहे. एकनाथ शिंदे गटाने सर्वात अगोदर टिझर प्रसारीत करून आघाडी कायम ठेवली आहे. आधीच्या दोन टिझरनंतर आता शिंदे गटाने रावणरुपी असुराचे दहन करूया असा संदेश देणारा तिसरा टिझर प्रसारित केला आहे. अत्यंत आकर्षक असलेला हा टिझरही सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

प्रतिष्ठेचा झालेला दसरा मेळावा साजरा करण्यासाठी ठाकरे अणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू झाली अहे. जास्तीत जास्त कार्यकर्ते आपल्याच मेळाव्याला कसे येतील यादृष्टीने दोन्ही गटांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होत आहे. दसरा मेळाव्याच्या आधीच कल्पक टिझर येत असल्याने दसऱ्याच्या आधीच सोशल मिडियावरच टिझर रुपाने कार्यकर्त्यांची गर्दी उसळली असल्याचं दिसून येत आहे.

हे ही वाचा:

भारतीय हवाई दलाला मिळाली स्वदेशी ‘प्रचंड’ ताकद

दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू

नवरात्र २०२२: तिबेटमधील शक्तीपीठ असलेली मनसा देवी

‘आदिपुरूष’ सिनेमाच्या टीझर रिलीजसाठी प्रभास, क्रिती पोहचले अयोध्येत

शिंदे गटाने आणलेल्या दुसऱ्या टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरे केंद्रस्थानी हेते. या टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरे रंगमंचावर भाषण देण्यासाठी आले असल्याचे दाखवण्यात आले आहे. या टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा वापर केला आहे. बाळासाहेबांच्या भाषण शैलीचा कलात्मक वापर या टिझरमध्ये केलेला बघायला मिळत आहे. त्याचबरेबर या टिझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा पुतळा तर एकनाथ शिंदे यांचे फोटोही टिझरमध्ये वापरण्यात आला आहे. हा टिझर नेटिझन्सना पंसत पडत नाही तोच आता आलेला तिसरा टिझर देखील तितकाच आकर्षक झाला आहे.

हे ही वाचा:

भारतीय हवाई दलाला मिळाली स्वदेशी ‘प्रचंड’ ताकद

दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू

नवरात्र २०२२: तिबेटमधील शक्तीपीठ असलेली मनसा देवी

‘आदिपुरूष’ सिनेमाच्या टीझर रिलीजसाठी प्रभास, क्रिती पोहचले अयोध्येत

नवरात्रीचा शेवटचा दिवस हा रावण दहनाचा दिवस असते. हा दिवस महत्वाचा मानला जातो . शिंदे गटाने आणलेल्या या नव्या टिझरमध्ये रावणाच्या दहा तोंडांना अतिशय समर्पक नावे देण्यात आली अहे. अधर्म, अन्याय लाचारी, बडवेगिरी, घराणेशाही, हस्तक्षेप, अपमान, खच्चीकरण, बेईमानी , वचनभंग या शब्दांचा अर्थपूर्ण उपयेग करण्यात आ ल्याचे टिझरमध्ये दिसून येत अहे. बडवेगिरी, घराणेशाही, हस्तक्षेप, खच्चीकरण या शब्दांच्या माध्यमातून शिंदे गटाने ठाकरे यांना टोला लगावला अहे. या शब्दांच्या माध्यमातून रावणरुपी असुराचे दहन करूया अशी साद शिंदे गटाने शिवसैनिकांना घातली असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version