हिंदू असल्याचे भासवत कासीमने केले लग्न, आता धर्मपरिवर्तनासाठी दबाव!

मध्य प्रदेशातील दमोह येथील घटना

हिंदू असल्याचे भासवत कासीमने केले लग्न, आता धर्मपरिवर्तनासाठी दबाव!

मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यामधून लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. हिंदू असल्याचे भासवून कासीमने तरुणीसोबत लग्न केले. आता धर्मपरिवर्तनासाठी तिच्यावर दबाव टाकत आहे. तसेच तरुणीला ॲसिड हल्ला करण्याची धमकी देखील दिली जात आहे. या प्रकरणी पिडीत हिंदू तरुणीने दमोह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हे प्रकरण मध्य प्रदेशातील दमोह येथील नूरी नगर येथील असल्याची माहिती आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार, ४ वर्षांपूर्वी कासिम नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदू तरुणीशी मैत्री केली आणि संवाद सुरु झाला. कासीमने आपला जात-धर्म लपवत तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्याशी गोड बोलून त्याने तिला तिच्या घरातून पळवून मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न केले. यावेळी तरुणी स्थब्ध झाली, मात्र घरातून पळून आल्याने तिच्याकडे आता मार्ग नव्हता. म्हणून तिने त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

यानंतर काही दिवसांतच कासिमने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, आरोपी तिच्यावर गोमांस खाण्यासाठी दबाव टाकू लागला. यासोबतच तिला हिंदू धर्मानुसार पूजा करण्यास मनाई करण्यात आली आणि मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

अत्याचाराची परिसीमा ओलांडल्यावर ती मुलगी कशीतरी कासिमच्या तावडीतून सुटली आणि आईच्या घरी आली, पण तिथेही ती सुरक्षित नव्हती. कासिम तिच्या आईच्या घरी आला आणि मुलीला मारहाण करू लागला. एवढेच नाही तर ॲसिड हल्ल्याची धमकी देऊन लाखो रुपयेही घेतले आहेत. पीडितेला कासिमकडून घटस्फोट हवा आहे, मात्र तो त्यासाठी तयार नाही. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी कासिम हा गाय तस्करीच्या अवैध धंद्यात सामील आहे. पेशाने तो खाटिक असल्याचे तिने सांगितले.

हे ही वाचा : 

पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित राज कुंद्राच्या घरासह कार्यालयावर छापे

बांगलादेशातील हिंदू धोक्यात, एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या!

गुजरातमध्ये एका सिरीयल किलरला अटक

‘इस्कॉन बांगलादेश’चे चिन्मय कृष्ण दास यांना समर्थन, म्हणाले पाठीशी आहोत!

दरम्यान,  ही बाब दमोह एसपीच्या निदर्शनास आली. पीडीतेचे म्हणणे ऐकून घेवून त्यांनी देहात पोलिस स्टेशनला तपासाअंती फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी कासिम आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

 

Exit mobile version