बांगलादेशाहुन निघालेले ‘रेमल चक्रीवादळ’ आता भारताच्या पश्चिम बंगालमध्ये पोहचले आहे.रेमल चक्रीवादळ रविवारी(२६ मे) रात्री पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला येऊन धडकले आहे.त्यामुळे किनारपट्टी भागात प्रचंड नुकसान झाले आहे.यामध्ये कोलकाता येथील एकाचा मृत्यू झाला.राज्यातील तीन किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा महत्वपूर्ण प्रभाव दिसून आला.त्यामुळे तब्बल २ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
रेमल चक्रीवादळामुळे कोलकात्याच्या एंटाली भागात घराचे छत कोसळून मोहम्मद साजिद युवकाचा मृत्यू झाला.रेमल चक्रीवादळ रात्री साडेनऊच्या सुमारास बांगलादेशमार्गे पश्चिम बंगालमध्ये पोहचले.सुरवातीला याची गती ताशी ११० ते १२० किमी होती, जी नंतर वाढून ताशी १३५ किमी झाली.यावरून हे चक्रीवादळ किती तीव्र आहे हे समजते.आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे डायमंड हार्बर, सागर बेट, हिंगलाज, संदेशखळी या भागात नुकसान झाल्याची माहिती आहे.काही ठिकाणी विजेचे खांब, झाडे कोसळले आहेत.तसेच काही घरांची पडझडही झाली आहे.
हे ही वाचा:
‘आईच्या मृत्यूनंतर मी अधिक धार्मिक झाले’
खोटे वृत्त पकडल्यानंतर ‘द वायर’ने त्यांच्या मतटक्क्यांचे वृत्त बदलले!
खासदार हत्येमागील सूत्रधार अमेरिकेत पळून गेल्याची शक्यता!
कोलकाता संघावर बक्षिसांचा वर्षाव
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजही कोलकात्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.रविवारी कोलकात्यात १४० मिमी पाऊस झाला.दरम्यान, कोलकात्यात चक्रीवादळाचा प्रभाव आता कमी झाला आहे.विशेष म्हणजे सेमल चक्रीवादळ आता बंगालमधून ओडिशात पोहचणार आहे.वादळ पोहचण्याआधी ओडिशाच्या प्रशासनाने अगोदरच खबरदारी घेत तशी तयारी केली आहे.