राहुल गांधींच्या विरोधात दलित समाजाकडून ‘जोडे मारो आंदोलन’

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची घोषणा

राहुल गांधींच्या विरोधात दलित समाजाकडून ‘जोडे मारो आंदोलन’

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधींनी अमेरिकेत केलेल्या आरक्षणाच्या वक्तव्यावर भारतात अजूनही संताप व्यक्त केला जात आहे. यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात आता दलित समाज, आरपीआय पक्षाकडून देशभरात ‘जोडे मारो आंदोलन’ सुरु करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर ) ही घोषणा केली.

आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले म्हणाले, दलित समाज, ओबीसी आणि आदिवासियाना दिलेल्या आरक्षणाबाबत कोणतीही तडजोड होवू शकत नाही. हे अधिकार कोणीही रद्द करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युतर दिले जाईल. दलित समाज, आरपीआय पक्षाकडून राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्याविरोधात देशव्यापी ‘जोडे मारो आंदोलन’ सुरु करण्यात येणार आहे. राहुल गांधी हे निरोपयोगी माणूस आहेत, ते जेव्हाही इंग्लंड किवा अमेरिकेला जातात तेव्हा भारताविरोधात बोलतात.

हे ही वाचा :

पोर्ट ब्लेअरचे नाव आता ‘श्री विजयपुरम’

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींच्या सहकाऱ्यांकडून पत्रकारावर हल्ला !

हरियाणा विधानसभा प्रचाराचे नेतृत्व पंतप्रधान मोदी, गडकरींसह ४० नेत्यांच्या हाती !

बिहारमध्ये बलात्कार करू पाहणाऱ्या डॉक्टरच्या गुप्तांगावर नर्सने केले वार !

बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आरक्षण कधीच संपणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, देशात लोकशाही नाही हे कसे शक्य आहे?, तसे नसेल तर राहुल गांधी यांनी ९९ जागा जिंकून विरोधी पक्षनेते कसे होऊ शकतात?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  लोकांनी आम्हाला जनादेश दिला आहे आणि एनडीए सरकार सर्वांना पुढे घेवून जात आहे, असे मंत्री आठवले म्हणाले.

Exit mobile version