बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना सोमवार, ३१ मार्च रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील त्यांच्या निवासस्थानी शांतता, करुणा, शिक्षण आणि मानवी हक्कांप्रती त्यांच्या आयुष्यभराच्या वचनबद्धतेबद्दल ‘गोल्ड मर्क्युरी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. गोल्ड मर्क्युरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि सरचिटणीस निकोलस डी सँटिस यांनी दलाई लामा यांना शांतीसाठी ‘गोल्ड मर्क्युरी पुरस्कार’ प्रदान केला.
निकोलस डी सँटिस यावेळी म्हणाले की, “तुम्हाला शांती आणि शाश्वततेसाठी ‘गोल्ड मर्क्युरी पुरस्कार २०२५’ प्रदान करणे हा एक मोठा सन्मान आहे. तुम्ही असे नेते आहात ज्यांच्या ज्ञानाने, करुणेने आणि शांततेसाठीच्या समर्पणाने जगाला प्रेरणा दिली आहे.” सँटिस पुढे म्हणाले की, दलाई लामा यांच्या सार्वत्रिक जबाबदारीच्या संदेशाने जगात शांतता निर्माण केली आहे.
“अनेक दशकांपासून तुम्ही अहिंसा, मानवी प्रतिष्ठा, आंतरधर्मीय संवाद आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाचे समर्थन केले आहे. नेहमीच आठवण करून देत आहात की खरी शांती ही अंतर्मनातून सुरू होते. तुमचा सार्वत्रिक जबाबदारीचा संदेश आपल्याला शिकवतो की आपण सर्व जोडलेले आहोत केवळ राष्ट्र म्हणून नाही तर एका मानवी कुटुंब म्हणून,” असे निकोलस डी सँटिस म्हणाले.
अहिंसा आणि शाश्वततेसाठी दलाई लामा यांच्या कामाचे आणि तिबेटच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे सॅन्टिस यांनी कौतुक केले. “अहिंसक मार्गांनी तिबेटच्या लोकांच्या हक्कांचे रक्षण केले आहे आणि शाश्वततेसाठी जागतिक आवाज देखील आहात, हवामान बदल हा जागतिक चिंतेचा विषय बनण्यापूर्वीच आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची तातडीची गरज आहे याची चेतावणी देत आहात,” असे ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा..
नमाजावेळी काळी पट्टी बंधणाऱ्यावर काय म्हणाले हुसेन ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी कसा होता मार्च?
जोशींनी का सांगितले औरंगजेबचा मुद्दा अनावश्यक ?
मोदींच्या उत्तराधिकारी विषयावर काय म्हणाले फडणवीस ?
सॅन्टिस म्हणाले की, जागतिक शांततेचा पुरस्कार करणाऱ्या दलाई लामांना त्यांच्या शिकवणींसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गोल्ड मर्क्युरी इंटरनॅशनलमध्ये, आम्ही धैर्य आणि सचोटीने भविष्य घडवणाऱ्या दूरदर्शी नेत्यांचा सन्मान करतो.